Header AD

कोरोना बाधित रुग्णांचे होणार समुपदेशन महापालिका करणार मानसिक आधार देण्याचे काम

 


ठाणे , प्रतिनिधी :  कोरोनामुळे बिघडणारे मानसिक संतुलन, वाढणारे ताणतणाव आणि यामुळे बिघडणारे आरोग्य या सगळ्यातून बाहेर पडून रूग्णांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने समुपदेशनाचा नवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या या नव्या उपक्रमाद्वारे ठाणे महापालिकेच्या बाळकूम येथील कोविड सेंटरमध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून रूग्णांना मानसिक आधार देण्याचे काम करण्यात येणार आहे. 


          या संदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी कोविड रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


          कोरोनाबाधित झाल्यानंतर नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागते. यावेळी त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली असते अशा वेळी त्यांना समुपदेशनाची प्रचंड गरज असते. त्यांना कोणातरी आपल्याशी संवाद साधने गरजेचे असते हे ओळखूनच ठाणे महापालिकेने रवीश दोबानी यांच्या सहकार्याने समुपदेशनाचा नवा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून या मानसिक धक्यातून बाहेर काढले जाणार आहे.


           कोरोनाच्या काळातील अनुभवांमुळे मानसिकदृष्ट्या रुग्ण खचून गेलेले असतात. थकवा, बैचेनी, अनाहूत अस्वस्थता, लक्ष केंद्रीत न होणे  अशा अनेक कारणांनी रुग्ण त्रस्त झालेले असतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला असतो. त्यामुळे कोरोनाकाळात मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी त्यांना समुपदेशन फार गरज असते. 


          याकरिता महापालिकेच्या विद्यमाने रवीश दोबानी आणि त्यांच्या तज्ञ टीमच्या माध्यमातून  सुयोग्य मार्गदर्शनाने रूग्णांना मानसिकदृष्ट्या सक्षम केलं जाणार आहे. वॉर्डमधील प्रत्येक रुग्णांना प्रत्यक्ष भेट देवून त्याना मानसिक आधार दिला जाणार आहे. 


         रवीश दोबानी हे गेली ३० वर्ष आरोग्य क्षेत्रात समुपदेशक म्हणून काम करत आहेत. नागरिकाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे सदृढ राहील याबाबत ते काम करत आहेत. समुपदेशनाच्या माध्यमातून रूग्णांना मानसिक आधार देण्याचे काम गेली अनेक वर्ष ते करत आहेत. 

कोरोना बाधित रुग्णांचे होणार समुपदेशन महापालिका करणार मानसिक आधार देण्याचे काम कोरोना बाधित रुग्णांचे होणार समुपदेशन महापालिका करणार मानसिक आधार देण्याचे काम Reviewed by News1 Marathi on April 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads