Header AD

दत्तनगर मधील त्या बहुचर्चित अनधिकृत बांधकामा प्रकरणी प्रफुल गोरेसह पाच जणांवर गुन्हा
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील बहुचर्चित अनधिकृत बांधकामावर अखेर गुरुवारी पालिकेने हातोडा मारला.सदर बांधकामावर पालिका कधी कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांना पडला होता.पालिकेच्या नाकावर टिच्चून या ठिकाणी बांधकाम सुरू होते.पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करा असे निर्देश दिले होते. गुरुवारी पालिकेने या बांधकामावर हातोडा मारला.या अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी प्रफुल गोरेसह पाच जणांवर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


प्रफुल गोरे , पंकज राजगोर,  संजय तिवारी, दयमंती वोरा, कमलेश शिंदे या पाच जणांवर डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथे चौकात सरकारी जागेवर अनधिकृत बांधकावर केल्याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गुरुवारी पालिका प्रशासन सदर ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह आले असता प्रफुल गोरे व अन्य काही जणांनी जमाव करून कारवाईस विरोध केला होता.कारवाई करण्यास आणलेल्या३ ब्रेकर , जेसीबच्या टायरची हवा काढली होती.पोकलन यंत्र कारवाईच्या ठिकाणी येण्याआधी डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल येथे अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.महापालिकेच्या कारवाईस अडथळा आणल्याने प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांनी प्रफुल गोरेसह पाच जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान , राजरोजपणे शहरात सरकारी जागेवर अनधिकृत बांधकाम होत असल्याचे उघड झाले आहे.सदर ठिकाणी बांधकाम सुरू असताना पालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गप्प का बसले होते, इतर ठिकाणीही सरकारी जागेवर अश्याच प्रकारे अनधिकृत बांधकामे सुरू असून पालिका प्रशासन या बांधकामावर कधी हतोडा मारणार असा प्रश्न नागरिक पालिका प्रशासनाला विचारत आहेत.
दत्तनगर मधील त्या बहुचर्चित अनधिकृत बांधकामा प्रकरणी प्रफुल गोरेसह पाच जणांवर गुन्हा दत्तनगर मधील त्या बहुचर्चित अनधिकृत बांधकामा प्रकरणी प्रफुल गोरेसह  पाच जणांवर गुन्हा Reviewed by News1 Marathi on April 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads