Header AD

कल्याण मध्ये दुकाने बंद मात्र रस्त्यावर नागरिकांची वर्दळ सुरूच लॉकडाऊनचा कोणताही परिणाम नाही
कल्याण , कुणाल म्हात्रे  :  वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी काल रात्री ८ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या संचारबंदीचा कल्याणमध्ये कुठेही परिणाम पाहायला मिळाला नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती खरी मात्र नागरिकांची वर्दळ रत्यावर मोठ्या प्रमाणावर सुरु होती. यामुळे या लॉकडाऊनचा कोणताही परिणाम कल्याणमध्ये झाल्याचे दिसून आले नाही.

      

             कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांच्या संख्येने १ लाखांचा आकडा ओलांडला असून कोरोनाची हि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहेत. मात्र नागरिकांकडून काही प्रमाणात प्रशासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन केले जात आहे. संचारबंदी लागू असतांना देखील कल्याणच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्यावतीने कंटेमेंट झोन सील करण्यात आले असून विविध रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत.

     

            अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद असल्याचे पाहायला मिळाले. स्टेशन परिसरात असलेल्या बाजारपेठेचा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून बंद करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन परिसरात देखील प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. तर रिक्षा स्टॅण्डवर रिक्षांची संख्या देखील मोठी होती. एरवी लॉकडाऊनच्या दिवशी स्टेशन परीसरात शुकशुकाट असायचा आज मात्र स्टेशन परिसर वाहनांच्या रहदारीने गजबजलेला होता. तर पोलिसांनी जागोजागी बंदोबस्त तैनात केला होता. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा देखील उगारण्यात आला.      

कल्याण मध्ये दुकाने बंद मात्र रस्त्यावर नागरिकांची वर्दळ सुरूच लॉकडाऊनचा कोणताही परिणाम नाही कल्याण मध्ये दुकाने बंद मात्र रस्त्यावर नागरिकांची वर्दळ सुरूच लॉकडाऊनचा कोणताही परिणाम नाही Reviewed by News1 Marathi on April 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads