Header AD

महानगर पालिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन




भिवंडी , प्रतिनिधी  ;  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्ताने महानगरपालिकेत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


                 त्यानंतर जुने मुख्यालय समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सभागृह नेते विकास निकम,  उपायुक्त मुख्यालय दीपक झिंजाड, सहाय्यक आयुक्त प्रशासन नितीन पाटील, प्रभाग समिती चार चे प्रभाग अधिकारी सुनील झळके, प्रभाग समिती पाचचे कार्यालय अधीक्षक सुनील भोईर, बांधकाम कार्यालय अध्यक्ष किशोर भदाणे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, प्रभाग समिती क्रमांक एकचे प्रभाग अधिकारी दिलीप खाने, निवडणूक विभाग प्रमुख गिरीश घोष्टेकर, कर मूल्यांकन कार्यलय अधीक्षक बाळाराम जाधव, सहा. आस्थापना विभाग  प्रमुख जितेंद्र  हे, दीपक चव्हाण अन्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


              प्रभाग समिती पाच मधील  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात प्रभाग समिती 5 चे सभापती फराग ( बाबा) बावउद्दीन यांच्या हस्ते  डॉ. बाबासाहेबांच्या आंबेडकर यांचे  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तर अंजुरफाटा येतील पुतळ्यास प्रभाग समिती 4 चे प्रभाग अधिकारी सुनील झळके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महानगर पालिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन महानगर पालिकेत भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन Reviewed by News1 Marathi on April 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads