Header AD

केंद्रीय वैद्यकीय आरोग्य पथक यांची भिवंडी शहरातील कोरोना बाबत तपासणी दौरा


सर्व उपाययोजना बघून समाधान व्यक्त केले - आयुक्त डॉ.पंकज आशिया....


भिवंडी ,  प्रतिनिधी  ;  भारत सरकारच्या केंद्रीय वैद्यकीय आरोग्य पथकाकडून भिवंडी महापालिकेतील कोरोना  बाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी आज करण्यात आली. या पथकात  केंद्रीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.गौतम आणि डॉ. उपमा यांचा समावेश होता. यांच्यासमवेत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कारभारी खरात, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बुषारा सय्यद, वैद्यकीय अधिकारी वर्षा बारोड हे महापालिकेच्या वतीने उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य पथकाने प्रथम स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयाच्या जवळील महापालिकेच्या rt-pcr ची पाहणी केली,  त्यानंतर येथील कोविड लसीकरण केंद्र याचे देखील भेट दिली. 


             त्यानंतर मिल्लत नगर रबी मेडिकल येथील कंटेनमेंट क्षेत्र, प्रतिबंधित क्षेत्र या ठिकाणी भेट दिली, त्याच्यानंतर मिल्लत नगर येथील आरोग्य केंद्र येथील संपूर्ण कोविडबाबत माहिती घेतली. त्यानंतर परशुराम टावरे येथील खुदाबक्ष कोविड सेंटर याची देखील माहिती घेण्यात आली.   त्यानंतर पालिकेत आयुक्त डॉक्टर पंकज आशिया व अतिरिक्त आयुक्त डॉक्टर ओमप्रकाश  दिवटे यांच्यासमवेत कार्यालयात बैठक घेण्यात आली. केंद्रीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर गौतम डॉक्टर उपमा यांनी एकूण सर्व परिस्थिती व कोवीड बाबत करण्यात येत आसलेल्या  उपाययोजना याबाबत समाधान व्यक्त केले, असून महापालिकेने काम चांगल्या प्रकारे केले आहे. 


             अशी माहीती पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी दिली.पालिकेच्या एकूण सर्व कामांबाबत   प्रशंसा करून समाधान व्यक्त केली. पण नागरिकांनी कोवीड  19 नियमांचे अनुपालन करणे आवश्यक यामध्ये मास्क वापरणं, सुरक्षित अंतर ठेवणें,  तसेच अन्य सर्व मार्गदर्शक सूचना यांचे  पालन करणे आवश्यक आहे, असे आयुक्त यांनी नमूद केले आहे. सर्व कामात नागरिकांचे  सहकार्य मिळणे आवश्यक  आहे, तरच कोविडवर मात करता येईल.

केंद्रीय वैद्यकीय आरोग्य पथक यांची भिवंडी शहरातील कोरोना बाबत तपासणी दौरा केंद्रीय वैद्यकीय आरोग्य पथक यांची भिवंडी शहरातील कोरोना बाबत तपासणी  दौरा Reviewed by News1 Marathi on April 11, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads