Header AD

लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीयांचा पुन्हा परतीचा प्रवास सुरू

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : संपूर्ण राज्यात कोरोंनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने लोकडाऊनचे निर्बंध कडक केले आहे. संचारबंदी आणि कडक निर्बंध लादूनही नागरिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहेत. या पार्श्वभुमीवर कडक लॉकडाऊन करण्याच्या शासन तयारीत आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात कडक लॉकडाऊची शक्यता वर्तवली जातेय. याचा थेट परिणाम परप्रांतीय मजुरांवर झालाय. परप्रांतीय मजुरांची आपल्या घरी पोहोचण्यासाठी धावपळ सुरु झाली आहे. त्यामुळे शेकडो मजुरांनी आपलं गाव गाठण्यासाठी कल्याण स्टेशनवर गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.

                   गेल्यावर्षी अचानक जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नांगरीकांनी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास  करत आपले गांव गाठले होते. लॉकडाऊन संपताच ही परप्रांतीय पुन्हा महाराष्ट्रात दाखल झाले होते. यंदाच्या कोरोंना रुग्णांची संख्या पाहता गत वर्षाची रुंगसंख्या कमी होती. मात्र सध्याची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून शासनाकडून लॉकडाऊन होऊ शकतो अशी माहिती मिळताच परप्रांतीयांनी आपले गांव गाठण्यासाठी स्टेशनला गर्दी करायला सुरवात केल्याचे पाहायला मिळत आहे. 

लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीयांचा पुन्हा परतीचा प्रवास सुरू लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीयांचा पुन्हा परतीचा प्रवास सुरू Reviewed by News1 Marathi on April 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads