Header AD

कल्याण डोंबिवलीत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा होणार नाही


■नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे आवाहन...


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :   वाढत्या कोरोना रूग्णांसोबतच कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने हे इंजेक्शन मिळणाऱ्या मेडिकल दुकानांसमोर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. कल्याण डोंबिवलीत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा भासणार नसून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी नागरिकांना केले आहे.


कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज  दिवसाला १ हजार  पेक्षाही अधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रोखण्यासाठी शासन, प्रशासन सर्वपरीने प्रयत्न करत आहे. मात्र सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. एकीकडे करोनाचा उद्रेक तर दुसरीकडे रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असून कल्याणातील मेडिकल दुकानांच्या  बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांनी  इंजेक्शनसाठी लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाले.


याची आमदार विश्वनाथ भोईर यांनी तात्काळ दखल घेत ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांना फोन लावून या प्रकाराची माहिती दिली. पालकमंत्र्यांनी या प्रकरणाची ताबडतोब  गंभीर दखल घेत तात्काळ इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून दिला असून यापुढे इंजेक्शनचा तुटवडा होणार नाही असे आश्वासनही दिले आहे. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर यांनी नागरिकांना केले आहे.

कल्याण डोंबिवलीत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा होणार नाही  कल्याण डोंबिवलीत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा होणार नाही Reviewed by News1 Marathi on April 09, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads