Header AD

२७गावा साठी नीळजे आणि घेसर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा
डोंबिवली शंकर जाधव )  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाची अत्यावश्यकता असतानाकल्याण डोंबिवली पालिके अंतर्गत येणारे  नीळजे आणि घेसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मात्र दयनीय अवस्थेत आहे.या रुग्णालयात

औषधांचा तुटवडा असून येथे कोवीडची कोणतीही तपासणी केली जात नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र २७ गावासाठी तयार  केले आहे.मात्र लसीकरणासाठी भिवंडी पासून नागरिक येथे येऊन उभे असतात अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिली. 

 

        

               कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत दोन हजारांच्या आसपास कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील निळजे आणि घेसर या गावांमध्ये असणारे प्राथमिक आरोग्य केंद्रावर मात्र कोणतीच सोय उपलब्ध नाही. 
       सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविलसीकरण सुरू आहे.रोज १०० नागरिकांचे लसीकरण केले जाते. मात्र ज्येष्ठ नागरिकांना सकाळी ७ वाजल्यापासून रांगेत उभे राहावे लागत असून कोणतीही सोय नसल्याने हे नागरिक उन्हात उभे असतात.पाण्याची सोय देखील नसून एखाद्याला चक्कर आली तर काय करावे असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे हे आरोग्य केंद्र ५ एकर जागेत असून बाजूला छोट्या छोट्या खोल्या देखील आहेत.           मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्या पडक्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. त्यांची डागडुजी केली तरी कोविड असलेल्या रुग्णांना या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ घेता येईल. या रुग्णालयात साप चावल्यानंतर मिळणारे औषध देखील उपलब्ध नसल्याने अनेकांना जीव गमवावे लागले असल्याची माहिती ग्रामस्थ मुकेश भोईर यांनी दिली.तरलसीकरण आणि तपासणी एकच ठिकाणी करणे चुकीचे होईल अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. 
           मात्र सध्या खाजगी हॉस्पिटल्सने देखील कोरोना चाचणी करणे थांबवले असून लवकर रिपोर्ट मिळत नसल्याने चाचणी थांबवले असे खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे अशा वेळी नागरिकांना सरकारी रुग्णालयाचा आधार असताना सरकारी रुग्णालयाच्या जागा अशा  धूळ खात पडल्याचे चित्र आहे. या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांना विचारले असता कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

२७गावा साठी नीळजे आणि घेसर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा २७गावा  साठी नीळजे आणि घेसर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा Reviewed by News1 Marathi on April 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads