Header AD

भिवंडी लोकसभा क्षेत्रातील वाडा तालुक्यात लसीचा कोटा,व्हेंटिलेटर पुरवठा करण्याच्या मागणी

  

■भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र...भिवंडी, दि. १९ (प्रतिनिधी)  ;   भिवंडी लोकसभा क्षेत्रातील  वाडा तालुक्यात लसींचा वाढीव पुरवठा करण्याबरोबरच पोशेरी कोविड केंद्रात व्हेंटिलेटर पुरवठा करण्याबरोबरच एमबीबीएस, एमडी (मेडिसिन) डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी भिवंडीचे  खासदार कपिल पाटील यांनी पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्याकडे केली आहे.


            वाडा तालुक्यातील वाडा, कुडूस, परळी आणि गोऱ्हे येथील केंद्रावर लसीकरण सुरू आहे. लसीकरणासाठी ठराविक वार देण्यात आले असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. वाडा तालुक्याला लसपुरवठा कमी असून, काही लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे वाडा तालुक्याला वाढीव लसकोटा द्यावा, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली ाहे.


                पोशेरी येथील कोविड केअर केंद्रावर १५० बेड आहेत. या केंद्रात एकही बेड रिकामा नसून, आवश्यक औषधांचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. या केंद्रात एमबीबीएस व एमडी (मेडिसिन) डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना उपचार मिळण्यास अडचणी येत आहेत. व्हेंटिलेटर बेडसाठी एम. डी. डॉक्टरांची आवश्यकता आहे. सध्या व्हेंटिलेटर नसल्यामुळे रुग्णांना अन्य रुग्णालयात हलवावे लागत आहे. तरी या रुग्णालयात व्हेंटिलेटर पुरवठा करून डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.
भिवंडी लोकसभा क्षेत्रातील वाडा तालुक्यात लसीचा कोटा,व्हेंटिलेटर पुरवठा करण्याच्या मागणी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील वाडा तालुक्यात लसीचा कोटा,व्हेंटिलेटर पुरवठा करण्याच्या मागणी Reviewed by News1 Marathi on April 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads