Header AD

योगामध्ये श्रेयाचा नवा जागतिक विक्रम

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये  इयत्ता ७वीत  शिकणारी विद्यार्थिनी श्रेया महादेव शिंदे हिने नॉन स्टॉप ४८  मिनिट ३८ सेकंद बर्फावर ९२ योगाची विविध आसने करण्याचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. तिने हा विक्रम अखिल भारतीय योगा महासंघ च्या योगा रेकॉर्ड बुक मध्ये नोंदवला आहे. तिच्या या विक्रमामागे श्रेयाची आई वंदना शिंदे व बहिण श्रुती शिंदे यांनी श्रेयाचा कसून सराव घेऊन विक्रम नोंदवण्यामागे परिश्रम घेतले आहेत.


श्रेया दहा वर्षाची असल्यापासून योगाकडे आकर्षित झाली. तिने अनेक स्पर्धांमधून पदके ही पटकावली असल्याचे मॉडेल शाळेच्या योगा शिक्षिका मेघा परब यांनी सागितले. तिने केलेले या विक्रमामुळे तिचे क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वत्र अभिनंदन होत आहे.

योगामध्ये श्रेयाचा नवा जागतिक विक्रम योगामध्ये श्रेयाचा नवा जागतिक विक्रम Reviewed by News1 Marathi on April 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads