Header AD

कोरोना तपासणी केंद्र सेक्टर ४ येथील रात्र निवारा केंद्र येथे सुरू करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी




नवी मुंबई , प्रतिनिधी   : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घणसोली रेल्वे स्टेशन येथे सुरू असलेल्या कोरोना (अँटीजन टेस्ट) तपासणी  केंद्रामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहेत. तपासणी करायला आलेल्या नागरिकांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत असून तिथे बसण्याची, पिण्याच्या पाण्याची पाणी आणि सॅनिटायझर ची व्यवस्था उपलब्ध नाही. 


तसेच या ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला आहे. तरी सदर चाचणी केंद्र हलवून महानगरपालिकेने सेक्टर ४ येथे उभारलेल्या रात्र निवारा केंद्र या ठिकाणी कोरोना चाचणी केंद्र सुरू करावे. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीचे नवी मुंबई सरचिटणीस सचिन कटारे यांनी केली आहे. 


नवी मुंबई महानगरपालिका एफ विभागाचे अधिकारी संजय तायडे यांना सदर मागणीचे निवेदन दिले असून कोरोना तपासणी केंद्रात नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन तपासणी साठी आलेल्या नागरिकांना बसण्यास जागा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे. सदर प्रसंगी युवक आघाडीचे घणसोली विभाग अध्यक्ष संकेत पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोना तपासणी केंद्र सेक्टर ४ येथील रात्र निवारा केंद्र येथे सुरू करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी कोरोना तपासणी केंद्र सेक्टर ४ येथील रात्र निवारा केंद्र येथे सुरू करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी Reviewed by News1 Marathi on April 07, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads