Header AD

कोविड आयसीयू वार्डमध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था करा


दुर्गा फाऊंडेशनच्या अध्यक्षा शोभा भोईर यांची मागणी ....


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : कोवीड आयसीयु वार्ड मधील रुग्णांना सीसीटीव्ही मार्फत पाहता येईल अशी व्यवस्था नातेवाईकांसाठी करण्याची मागणी दुर्गा फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा शोभा भोईर यांनी नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


नवीमुबंई शहरात कोविड रुग्णसंख्या ११ हजार पार पोहचली आहे. त्यातील शेकडो रुग्ण हे आयसीयुत उपचार घेत आहेत. रुग्ण आयसीयुमध्ये  पोहोचल्यावर रुग्णांला पाहता येत नाही. नातेवाईक आयसीयु कक्षाच्या बाहेर दिवसरात्र काळजीत बसलेले असतात. आपला रुग्ण कसा आहे, याबाबत आयसीयु कक्षात येणाऱ्या जाणाऱ्या नर्स,वार्डबॉयडॉक्टर यांच्याकडे सातत्याने विचारणा करण्यात येते, त्यामुळे डॉक्टरांना देखील ते असहाय्य होते.


 अनेकदा आयसीयुत गेलेले अनेक रुग्ण मृत पावल्याने नातेवाईकांसाठी तो अखेरचा सहवास ठरतो. मुत्युनंतर देखील पार्थिवाचे दर्शन घेता येत नाही हे अत्यंत वेदनादायी आहे. त्यामुळे आयसीयुत असलेल्या आपल्या रुग्णांस पाहता यावे यासाठी आयसीयु कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे लावुन त्याचा डीस्पले रुग्णालयातील आवारात लावल्यास नातेवाईकाना आपल्या रुग्णांवर लक्ष ठेवता येईल. त्यामुळे आयसीयु बाहेर किंवा रुग्णालयात होणारी गर्दी कमी होईल आणि जीवाला घोर लागलेल्या नागरिकांना दिलासा मिळेल.


 त्यामुळे आयुक्तांनी खाजगी व सरकारी रुग्णालयात सीसीटीव्ही व त्यातुन बाहेरील योग्य ठिकाणी डीस्पलेची व्यवस्था करण्याचे आदेश रुग्णालयांना देऊन नागरिकांना दिलासा देण्याची मागणी दुर्गा फाऊंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्ष शोभा भोईर यांनी केली आहे.

कोविड आयसीयू वार्डमध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था करा कोविड आयसीयू वार्डमध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था करा Reviewed by News1 Marathi on April 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads