ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कल्याण मध्ये नो हॉर्न जनजागृती रिक्षा चालकांनी घेतली हॉर्न न वाजवण्याची शपथ
कल्याण , कुणाल म्हात्रे : नागरीकरण वाढत असताना जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा विपरीत परिमाण मानवी जीवन आणि पर्यावरणावर होत आहे. तीन प्रकारच्या प्रदूषणापैकी ध्वनी प्रदूषण रोखणो हे सहज शक्य आहे. त्यासाठी आज कल्याण स्टेशन परिसरात आर.टी.ओ, वाहतूक पोलीस, हिराली फाऊंडेशन आणि आर.एस.पी. अधिकारी यांच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नो हॉर्न याविषयी जनजागृती करण्यात आली.
आज सायंकाळी हिराली फाऊंडेशनच्या अध्यक्षा सरीता खानचंदानी यांच्या पुढाकाराने ही जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण, आरटीओ अधिकारी दीपक शिंदे, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुखदेव पाटील, आर.एस.पी. अधिकारी युनिट कमांडर मणिलाल शिंपी आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी रिक्षा चालकांना नो हॉर्नचे स्टीकर्स वाटप करण्यात आले.
विना कारण हॉर्न वाजविल्याने ध्वनी प्रदूषण होते. त्याचा विपरीत परिमाण मानवी जीवनावर होतो. आक्रमता, चिडचिडेपणा, रक्तदाब आदी व्याधी ध्नवी प्रदूषणामुळे जडतात. विशेष म्हणजे अनेकांना बहिरेपणा येऊ शकतो. ध्वनी प्रदूषण रोखणो हे आपल्या हाती आहे. त्यासाठी हिराली फाऊंडेशने पुढाकार घेतला आहे. रिक्षा चालकांना विना कारण हॉर्न वाजविण्या विषयीची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमात रिक्षा चालक व अन्य वाहन चालकांनी सहभागी घेतला.
Post a Comment