Header AD

घरातील वीज वापरावर लक्ष ठेवण्याचे महावितरणचे आवाहन


■तापमानाचा वाढता पारा व वर्क फ्रॉम होममुळे वापर वाढण्याची शक्यता....


कल्याण , कुणाल म्हात्रे  :  वर्क फ्रॉम होम आणि तापमानाचा वाढता पारा यामुळे घरगुती वीज ग्राहकांच्या वीज वापरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे घरातील वीज वापरावर लक्ष ठेवण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने ग्राहकांना करण्यात आले आहे.


महावितरणच्या ग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर वीज वापरानुसार संभाव्य वीजबिलाचा अंदाज पाहण्यासाठी कॅल्कुलेटर (गणक) उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करुन घरातील वीज वापराचे संभाव्य बिल पाहता येते व घरातील वीज वापरावर लक्ष ठेवून अनावश्यक वीज वापर टाळता येऊ शकतो. वीज ग्राहकांनी आपल्या वीज वापरावर लक्ष व नियंत्रण ठेवावे आणि मीटर रीडिंग शक्य नसलेल्या ठिकाणी मोबाईल ॲपद्वारे रीडिंगचा फोटो पाठवून सहकार्य करावेअसे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.   


कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच ऊन्हाच्या तिव्रतेसोबत तापमानाचा पाराही वाढत असल्याने पंखे वातानुकूलन यंत्रणा आदींचा वापर वाढत आहे. घरीच राहणारे नागरिकघरातून काम करणारे कर्मचारी व वाढते तापमान यामुळे घरगुती ग्राहकांच्या वीज वापरातील वाढ अनिवार्य ठरते.


गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या एप्रिलमे व जून महिन्यात मीटर रीडिंग शक्य न झाल्याने हिवाळ्यातील कमी वीज वापराप्रमाणे सरासरी वीजबिले देण्यात आली होती. मीटर रीडिंगनंतर सर्व सवलतींचा लाभ देऊन अचूक वीजबिले ग्राहकांना देण्यात आली. वीज वापरानुसार अचूक वीजबिले देऊनही ग्राहकांमध्ये गैरसमज पसरवण्यात आला. परिणामी लॉकडाऊन कालावधी सुसह्य करण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या महावितरणला आर्थिक तर कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाचा सामना करावा लागला.


       गेल्यावर्षीची पुन:रावृती टाळण्यासाठी ग्राहकांनी घरातील वीज वापरावर लक्ष ठेवण्यासह मीटरवरील रीडिंगचे निरिक्षण करावे. तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे अथवा संकेतस्थळावर बाराअंकी ग्राहक क्रमांक नमूद करून प्राप्त होणारे वीजबिल डिजिटल माध्यमातून ऑनलाईन भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 


      अखंडित वीजसेवेचे कर्तव्य बजावताना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कोकण प्रादेशिक विभागातील सहा चांगले अधिकारी महावितरणने गेल्या चार दिवसात गमावले आहेत. हे कधीही भरून न येणारे नुकसान असून या बिकट परिस्थिला सामोरे जात ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्राणाची बाजी लावून वीज कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.  
घरातील वीज वापरावर लक्ष ठेवण्याचे महावितरणचे आवाहन  घरातील वीज वापरावर लक्ष ठेवण्याचे महावितरणचे आवाहन Reviewed by News1 Marathi on April 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads