Header AD

भिवंडीत आणखी सहा रुग्णालयांना कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यास परवानगी




भिवंडी दि.१६(प्रतिनिधी )  भिवंडी शहरात दिवसेंदिवस कोविड रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनातर्फे शहरातील खाजगी रुग्णालयात कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे.आतापर्यंत सुरू असलेल्या तेरा रुग्णालयांव्यतिरिक्त अजून सहा रुग्णालयांना डिडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे . भिवंडी शहरातील रुग्णांसाठी पालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील मिळून आठ रुग्णालयात डिडिकेटेड कोविड  हेल्थ सेंटर तर पाच रुग्णालयात डिडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करण्यास परवानगी दिली होती.दरम्यानच्या काळात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.



              त्यामुळे नियुक्त खाजगी रुग्णालयांकडून आरोग्य सेवा पुरविण्याचे प्रयत्न तोकडे पडत असल्याने पालिका प्रशासनाने रुग्णांसाठी शहरातील विविध भागात रुग्णालय सेवा उपलब्ध व्हावी म्हणून संकल्प हॉस्पिटल नारपोली, भिवंडी हेल्थ केयर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, शाह मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल अंजुरफाटा,जीवक मल्टीस्पेशालिटीस हॉस्पिटल, प्राजक्ता हॉस्पिटल व स्पेक्ट्रम हॉस्पिटल अंजुरफाटा या सहा खाजगी हॉस्पिटलयांना समर्पित कोविड आरोग्य केंद्र म्हणून कोविड रुग्णांवर उपचार करणेसाठी पालिकेकडून परवानगी देण्यात आलेली आहे.



                  या  रुग्णालयांमध्ये शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार उपचार खर्चाची आकारणी करण्यात येणार आहे. ज्या कोविडने बाधीत व्यक्तींना खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावयाचे आहेत त्यांनी महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या व घोषित केलेल्या उपरोक्त नमुद रूग्णालयात उपचार घ्यावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. के. आर. खरात यांनी नागरीकांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
भिवंडीत आणखी सहा रुग्णालयांना कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यास परवानगी भिवंडीत आणखी सहा रुग्णालयांना कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यास परवानगी Reviewed by News1 Marathi on April 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads