Header AD

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उन्हाळी योगा शिबिर

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  सध्या कोरोना महामारीच्या लाटेने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले असून याचा सामना करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे. हि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी स्पोर्ट्स केअर फाउंडेशनकल्याणच्या वतीने विशेष उन्हाळी योगा शिबिराचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे.   


लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये या ७ दिवसीय ऑनलाईन उन्हाळी योगा शिबिर ५ मे ते ११ मे दरम्यान आयोजित केले असून हे शिबिर सर्व वयोगटासाठी खुले असणार आहे. या ७ दिवसाच्या शिबिरामध्ये योगा बेसिक आणि काही योगा आसने यांचे प्राथमिक स्वरूपात ट्रेनिंग देण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यात प्रतिवर्षी उन्हाळी सुट्टीमध्ये  विविध खेळाच्या शिबीरांचे आयोजन करण्यात येते. 


 गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे सर्व शिबिरांना ब्रेक लागला असून काही खेळाचे शिबिरे हे फक्त ऑनलाईन घेतले जात आहेत. त्यामध्ये योगाबॉडी फिटनेसटायकोंडोकराटे  व अन्य काही खेळांचा यामध्ये समावेश आहे. योगा शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी  9820991450 संपर्क साधण्याचे आवाहन करुणा लेदे यांनी केले आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उन्हाळी योगा शिबिर रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उन्हाळी योगा शिबिर Reviewed by News1 Marathi on April 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads