Header AD

पालिकेचे लसीकरण शिवसेनेच्या माध्म मातून नवा पाड्यातील नागरिकांना दिलासा
डोंबिवली शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाकूरवाडी नागरी आरोग्य केंद्र यांच्या वतीने  नवापाडा येथील मदन मोहन मालवीय हिंदी शाळेत  शिवसेना प्रभाग क्र.५९ आणि ४८च्या माध्यमातून  लसीकरण सुरु केल्याने स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.स्थायी समितीचे माजी सभापती जनार्दन म्हात्रे आणि युवा सेनेचे विधानसभा अधिकारी राहुल श्रीधर म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून लसीकरण सुरु झाले आहे.           याबाबत राहुल म्हात्रे म्हणालेराज्याचे  मुख्यमंत्री उध्दव ठाकरेपर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात कोरोना नियंत्रणसाठी अटोकाट प्रयत्न सुरु आहे. लसीकरण हा त्याचा भाग आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सुरु केलेल्या मोहीमे अंतर्गत डोंबिवली येथे विविध भागात लसीकरण सुरु झाले.  दुसऱ्या लाटेत नवापाडा भागात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढू लागली.यावर नियंत्रणासाठी जनार्दन म्हात्रे यांनीपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना निवेदन दिले.त्यानुसार येथे लसीकरण सुरु झाले.           

          त्यामुळे करोनाची  संसर्ग वाढ कमी होण्याची शक्यता आहे.फ्रंटलाईन आणि आरोग्य सेवेतील कार्यरत कर्मचारी व ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यातयेत आहे.येथे सामाजिक अंतराचे भान राखून आणि नागरिकांची गैरसोय टाळून १० ते ४ वाजेपर्यंत लसीकरण सुरु आहे.१८ वर्षावरील नागरिकांना लस मिळण्यासाठी आम्ही नियोजन केले आहे. मात्र नागरिकांना विनंती आहे कि,त्यांनी मास्क वापरणे,सामाजिक अंतर ठेवणे,  स्वतः जबाबदारी घेणे यावर कटाक्ष पाळावा असे राहुल म्हात्रे म्हणाले. 
       माजी नगरसेविका गुलाब म्हात्रे``प्रभाग क्षेत्र माजी सभापती आणि माजी नगरसेविका  रेखा म्हात्रेअक्षय म्हात्रे, शिवसेनेचे विभाग प्रमुख तुषार शिंदे,शाखाप्रमुख राहुल किरमहिला संघटक जाई पवार,केतकी पवार आणि  दोन्ही प्रभागातील शिवसैनिक लसीकरण  योग्य  रितीने पार पडावे यासाठी नियोजनात सहभागी होत आहेत.

पालिकेचे लसीकरण शिवसेनेच्या माध्म मातून नवा पाड्यातील नागरिकांना दिलासा पालिकेचे लसीकरण  शिवसेनेच्या माध्म मातून नवा पाड्यातील  नागरिकांना दिलासा Reviewed by News1 Marathi on April 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads