Header AD

प्रोडिजी फायनान्सने आपल्या पोर्ट फोलि ओचा विस्तार केला


सहा आंतरराष्ट्रीय कॉलेजसोबत केली भागीदारी ~

 

मुंबई, २७ एप्रिल २०२१ : भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी, प्रोडिजी फायनान्स या आघाडीच्या क्रॉस बॉर्डर फिनटेक प्लॅटफॉर्मने विदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. अमेरिका आणि ब्रिटनमधील सहा लोकप्रिय विद्यापीठांशी प्लॅटफॉर्मने करार केला आहे. यात युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सास-कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सॅन दिएगो स्टेट युनिव्हर्सिटी- कॉलेज ऑफ सायन्सेस, लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, युनिव्हर्सिटी अॅट अलबानी- कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस, जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटी- स्पिअर्स स्कूल ऑफ बिझनेस यांचा समावेश आहे. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठांची निवड करण्यासाठी जास्त पर्याय उपलब्ध असून उज्वल भवितव्याकरिता ते अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील.


 

प्रोडिजी फायनान्सचे भारतातील प्रमुख मयांक शर्माम्हणाले, “विदेशात शिकायला जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढताना दिसते. आमचा पोर्टफोलिओ अपडेट केल्यानंतर, विद्यार्थ्यांना अधिक विद्यापीठांचे पर्याय मिळतील, यापैकी त्यांच्यासाठी योग्य ठिकाणाची ते निवड करू शकतील. अर्थसहाय्याच्या बाबतीत, पुढील तीन वर्षात २०,००० पात्र भारतीय विद्यार्थ्यांना १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज देण्याची आमची इच्छा आहे. विद्यार्थ्यांना जगातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था आणि अभ्यासक्रमाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

 


पोर्टफोलिओमध्ये नवी भर घालत, प्रोडिजी फायनान्सने आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त कॉलेज, १००० पेक्षा जास्त पदव्युत्तर अभ्यासक्रम, यापैकी बहुतांश गेल्या काही वर्षात वाढलेल्या मागणीनुसार एसटीईएम (STEM) विषयांवर भर देतात.. इत्यादींना पाठबळ देते. यामुळे प्रोडिजी फायनान्सच्या व्यावसायिक नियोजनाला ऐतिहासिक बळ मिळते.

प्रोडिजी फायनान्सने आपल्या पोर्ट फोलि ओचा विस्तार केला प्रोडिजी फायनान्सने आपल्या पोर्ट फोलि ओचा विस्तार केला Reviewed by News1 Marathi on April 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads