Header AD

२०लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची झाली दुर्दशा

 कल्याण, कुणाल  म्हात्रे  : डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल जवळ असलेल्या २० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची दुर्दशा झाली आहे.  हि टाकी पडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून हि दुर्घटना टाळण्यासाठी हि टाकी पाडून याठिकाणी नवीन टाकी बांधण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी एमआयडीसीकडे केली आहे.    

 

डोंबिवलीतील घरडा सर्कल जवळील एमआयडीसीकडे ताब्यात असलेला हा जलकुंभ सन १९८०मध्ये बांधून पुर्ण झाला होता,  त्याला आता ४१ वर्ष झाली आहेत. करोडो रुपये खर्च करून ह्या बांधलेल्या जलकुंभाचा वापर त्यावेळे पासून काही तांत्रिक कारणाने झाला नाही, असे एमआयडीसीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांकडून खात्रीलायक समजले आहे. त्या जलकुंभाचा वापर कधी पासून बंद करण्यात आला होता सदर जलकुंभ बांधण्यासाठी एकूण किती रक्कम लागली होती ह्याबद्दल माहिती अधिकारातून  ४ ऑक्टोबर २०१७ रोजी हि माहिती उपलब्ध नाही असे उत्तर एमआयडीसी कडून देण्यात आले होते.


या जलकुंभाचा वापर दुरुस्ती करून होणार आहे का किंवा काँक्रिट स्लॅबची झालेली पडझड व त्यातील सळ्या गंजल्यानेते धोकादायक असल्यास दुर्घटना घडू नये म्हणून सदर जलकुंभाचे बांधकाम तोडून टाकणार आहेत का यावर त्यावेळी एमआयडीसी तर्फे असे सांगण्यात आले होते कीया जलकुंभाची  उपयुक्तता व आयुष्य संपुष्टात आल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट  करून त्याचा अहवाल आल्या नंतरच ते पाडून टाकणे योग्य होईल. एमआयडिसीनें दिनांक १२ सप्टेंबर २०१७ रोजी वरिष्ठांना पाठविलेल्या कार्यालयीन टिप्पणी मध्ये या जलकुभा संदर्भात  सविस्तर टिप्पणी लिहल्या गेल्या आहेत.


डोंबिवली वेलफेअर असोसिएशन तर्फे या पाण्याची टाकीजलकुंभ संदर्भात त्यावेळी उद्योग मंत्रीकार्यकारी अभियंता यांना पत्रव्यवहार केला होता. नंतरही डोंबिवली एमआयडीसी अधिकाऱ्यांशी याबाबत सतत पाठपुरावा करण्यात येत होता. अद्याप स्ट्रक्चरल ऑडीट अहवाल बाबत आम्हाला माहिती दिली नसल्याचे राजू नलावडे यांनी सांगितले.


 सद्या २७ गावासहित एमआयडीसी डोंबिवली परिसराला होत असलेल्या पाणी टंचाई मुळे या मध्यवर्ती उंच भागातील पाण्याची टाकी दुरुस्ती करून पुन्हा वापर करता येईल का किंवा तेथेच ती पाडून नवीन जास्त क्षमतेचा जलकुंभ बांधता येईल का  याची चाचपणी व पाहणी करावी अशी मागणी राजू नलावडे यांनी केली आहे.


सदर जलकुंभ परिसर भूखंड १३४०८ चौ.मीटर इतका मोठा असल्याने व ही जागा उंचावर असल्याने तेथे ५०लाख लिटर क्षमतेचा मोठा जलकुंभ भविष्यात बांधता येऊ शकेल. सन १९८०  मध्ये बांधलेल्या या २० लाख लिटर जलकुंभाचा वापर सुरवातीपासून का करण्यात आला नाही ?


तसेच त्यासाठी आलेला खर्चही वाया गेल्यामुळे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. सदर जलकुंभाचा वापर कधीपासून बंद झाला व बांधण्यासाठी आलेला खर्च याची माहिती एमआयडीसी देत नाही हे संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात हा भूखंड व्यापारी  कारणासाठी विकू नये याचा वापर  जलकुंभासाठीच करण्याची मागणी देखील राजू नलावडे यांनी एमआयडीसीकडे केली आहे. 

२०लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची झाली दुर्दशा २०लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची झाली दुर्दशा Reviewed by News1 Marathi on April 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads