Header AD

भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्याकडून विद्यार्थीनीच्या पत्रावर ५१ हजारांची मदत!




भिवंडी, दि. १३ (प्रतिनिधी)  :  दहावीतील विद्यार्थीनीने मणक्यावरील शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन करणाऱ्या विनंतीपत्रावर खासदार कपिल पाटील यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. या विद्यार्थीनीला लगेचच ५१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.


               भिवंडीतील दादासाहेब दांडेकर विद्यालयातील दहावीच्या वर्गात कु. आकांक्षा सतीश ठोंबरे शिकते. तिला अवघ्या १६ व्या वर्षी मणक्याचा आजार झाला. या आजारावर मोठ्या ऑपरेशनचा इलाज होता. त्यासाठी ज्युपिटर रुग्णालयात तब्बल ५ ते ६ लाखांचा खर्च येणार आहे. आकांक्षाच्या पालकांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. पैसे कसे जमवायचे, याची आकांक्षासह पालकांना चिंता होती.


               त्यावेळी आकांक्षाने भिवंडीतील दानशूरांना मदतीचे पत्र लिहिले. आपल्या आजाराची माहिती देत मदतीचे आवाहन केले. आकांक्षाचे पत्र पाहून तत्काळ खासदार कपिल पाटील यांनी ५१ हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. आकांक्षाशी संपर्क साधून तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच तिला तातडीने धनादेशाद्वारे ५१ हजार रुपये मदत देण्यात आली. तसेच सर्वोतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. या वेळी भाजपाचे नगरसेवक सुमित पाटील, भाजपाच्या भिवंडी उत्तर मंडल अध्यक्षा मानसी पुण्यार्थी यांची उपस्थिती होती. या मदतीबद्दल आकांक्षासह तिच्या पालकांनी आभार मानले आहेत.
भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्याकडून विद्यार्थीनीच्या पत्रावर ५१ हजारांची मदत! भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्याकडून विद्यार्थीनीच्या पत्रावर ५१ हजारांची मदत! Reviewed by News1 Marathi on April 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads