Header AD

कोरोना' आपत्तीत सर्वांनी एकत्र येऊन कार्याची गरज खासदार कपिल पाटील यांचे आवाहन

भिवंडी, दि. २६ (प्रतिनिधी) :
`कोरोना' आपत्तीच्या काळात कोणतेही राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन `कोरोना'ने निर्माण केलेल्या आणीबाणीला सामोरे जावे, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी रविवारी येथे केले. त्याचबरोबर सवाद जिल्हा कोविड रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करून ते पूर्ण क्षमतेने सुरू करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाला केले.


                  भिवंडी तालुक्यातील सवाद येथील केंद्रासंदर्भात रुग्ण व नातेवाईकां कडून तक्रारी केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार कपिल पाटील यांनी काल रविवारी सवाद केंद्राला भेट दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य देवेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती गुरुनाथ गायकर, उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर, राम माळी, श्रीकांत गायकर, दत्तात्रय पाटोळे, यशवंत सोरे, भाजयुमोचे जिल्हा कार्याध्यक्ष जगन पाटील, डॉ. राहूल घुले आदी उपस्थित होते.


             ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. मात्र, सवाद येथील केंद्रात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा नसल्यामुळे रुग्णांना दाखल करता येत नाही. त्यामुळे पुरेसा ऑक्सिजन साठा ठेवून सर्वच्या सर्व ८८० बेडवर रुग्णांना दाखल करावे, अशा सुचना खासदार कपिल पाटील यांनी दिल्या.


            जिल्ह्यातील खेड्यातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्याबरोबरच उपाययोजनांमध्ये आरोग्य यंत्रणा तोकडी पडली आहे. या काळात राजकारण करणे योग्य नाही. त्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाच्या आणीबाणीला सामोरे जावे लागले. केंद्र सरकारकडून ऑक्सिजन साठ्याबरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाढीव कोटा देण्यात आला आहे.            राज्य सरकारही कोरोनासाठी उपाययोजना करीत आहे. या काळात सामान्य नागरिकांनीही सरकारच्या सुचनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले. सवाद रुग्णालयात २४ टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहे. या प्लांटचीही खासदार कपिल पाटील यांनी पाहणी केली. त्यावेळी १ मेपर्यंत प्लांट सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कोरोना' आपत्तीत सर्वांनी एकत्र येऊन कार्याची गरज खासदार कपिल पाटील यांचे आवाहन कोरोना' आपत्तीत सर्वांनी एकत्र येऊन कार्याची गरज खासदार कपिल पाटील यांचे आवाहन Reviewed by News1 Marathi on April 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads