Header AD

कोरोनाच्या दुसऱ्या अति संवेदनशील परिस्थितीत देखील आरएसपी अधिकारी पोलीस प्रशासना सोबत

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोनाच्या दुसऱ्या अतिसंवेदनशील परिस्थितीत देखील आरएसपी अधिकारी पोलीस प्रशासना सोबत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.


कल्याण डोंबिवली युनिट मधील आरएसपी अधिकारी कल्याण डोंबिवली मध्ये महाराष्ट्र राज्याचे महासमादेशक अरविंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालीकमांडर मणिलाल शिंपी यांच्या नेतृत्वामध्ये पोलिसांना  बंदोबस्तासाठी सहकार्य करत आहेत. कल्याण डोंबिवलीतील रामनगरमहात्मा फुलेखडकपाडाबाजारपेठकोळसेवाडी, मानपाडाविष्णुनगर आणि टिळकनगर पोलीस स्टेशन अंतर्गत आरएसपी शिक्षक हे विशेष पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्यावर आहेत.


यामध्ये आरएसपी अधिकारी जितेंद्र सोनवणेबन्सीलाल महाजनबाळासाहेब भोसलेसंजय फिरकेसंतोष गोरडेसुभाष वानखेडेदत्तात्रय सोनवणेछोटू अहिरेविजय भामरेवसंत गावितभगवान परदेशी, भानुदास शिंदे, रेखा प्रभू, संदीप शेळकेयांच्यासह कमांडर मनीलाल शिंपी विशेष कर्तव्य करीत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी आणि महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग अधिकारी यांच्याकडून आरएसपी अधिकारी युनिटतर्फे जी सेवा केली जात आहे त्याबद्दल विशेष कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.


पोलीस प्रशासनाला मदत करूनही गरजू आणि काम बंद झाल्यामुळे उपासमार होणाऱ्या लोकांना दररोज स्वामीनारायण ट्रस्ट, कामा असोसिएशन यांच्या सहकार्याने ५०० लोकांना भोजन वाटप देखील आरएसपी अधिकारी युनिट मार्फत केले जात आहे.


कोरोनाच्या दुसऱ्या अति संवेदनशील परिस्थितीत देखील आरएसपी अधिकारी पोलीस प्रशासना सोबत कोरोनाच्या दुसऱ्या अति संवेदनशील परिस्थितीत देखील आरएसपी अधिकारी पोलीस प्रशासना सोबत Reviewed by News1 Marathi on April 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads