Header AD

शेतकरी उन्नती मंडळाच्या अध्यक्ष पदी राजू पाटील बिनविरोध

भिवंडी : ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील शेतकरी उन्नती मंडळाच्या अध्यक्ष पदी राजू अनंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्व परशराम धोंडू टावरे विद्यालय काल्हेर येथे नुकत्याच विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे  अध्यक्ष राजू अनंत पाटील यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने सदरच्या सभेत सर्व संचालकांनी ठरविले की, कोणत्याही प्रकारची निवडणूक न घेता राजू पाटील आपणच अध्यक्षपदी रहावे असे सर्वानुमते सांगण्यात आल्याने सदरच्या विशेष सभेत अध्यक्ष  पदी  राजू पाटील यांची शेतकरी उन्नती मंडळाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याचे जाहीर होताच सर्व संचालकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.             मागील तीन वर्षांमध्ये राजू पाटील यांची कामाची पद्धत पाहता त्यांच्या विरोधात कुणीच अर्ज दाखल केला नाही. त्यांच्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत अनेक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. काल्हेर येथे कॉलेज, आमने येथे कॉलेज सुरू केले आहेत. तसेच शेतकरी उन्नती मंडळाच्या वतीने भिवंडी तालुक्यात काल्हेर येथील स्व परशराम धोंडू टावरे विद्यालय  ,करिवली येथे प्रेमाबाई सुकऱ्या पाटील विद्यालय व आमने येथे सीताराम रामा पाटील विद्यालय  सुरू आहेत.राजू पाटील हे वळगावचे रहिवाशी असून एक नामांकित उद्योगपती,दानशूर व्यक्तिमत्व, तसेच  बांधकाम व्यवसाईक आहेत. . अंत्यत मनमिळाऊ त्यांचा स्वभाव असल्याने त्यांनी अनेक माणसे जोडली आहेत. राजू पाटील यांना गेल्यावर्षी दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आगरी महोत्सव भिवंडी मध्ये त्यांची टॉप टेन मध्ये निवड होऊन त्यांना शैक्षणिक 
क्षेत्राचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर ठाणे येथे त्यांना कोकण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.              गेल्या ६४ वर्षांमध्ये पहिल्यांदाच  सलग दुसऱ्यादा अध्यक्ष पदी निवड होणारे एकमेव राजू पाटील .कारण आपल्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी दोन प्रायमरी इंग्लिश स्कुल,आमने येथे ज्युनियर कॉलेज, काल्हेर येथे सिनियर कॉलेज, सुसज्ज अशी लॅब, कम्प्युटर लॅब, भव्य इमारत उभी करून ७००० लोक बसतील असा सुसज्ज हॉल अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या विशेष सभेत सर्व संचालकांनी सांगितले की कुठल्याही प्रकारची निवडणूक न घेता मोठया मनाने सर्वांनी सांगितले की अध्यक्ष पदी तुम्हीच रहा.

 

                तसेच येत्या ३ वर्षांमध्ये त्यांचा पुढील  मानस आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्या प्रमाणे येणाऱ्या नवीन अभ्यास क्रमाबाबत मी सहमत असेन तसेच माधवराव बालमंदिर काल्हेर येथील २२ वर्ष जीर्ण झालेली व मोडकळीस आलेल्या नवीन इमारत उभारणे त्याच बरोबर अभिनव बालमंदिर ताडाळी येथील इमारत कमकुवत झाल्याने नवीन इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू केले जाईल अशी माहिती आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.             राजू पाटील यांची शेतकरी उन्नती मंडळाच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याने शेतकरी उन्नती मंडळाचे सर्व संचालक, प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच वळ गावच्या ग्रामस्थांनी तसेच पंचक्रोशीतून व भिवंडी तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शेतकरी उन्नती मंडळाच्या अध्यक्ष पदी राजू पाटील बिनविरोध  शेतकरी उन्नती मंडळाच्या अध्यक्ष पदी राजू पाटील बिनविरोध Reviewed by News1 Marathi on April 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads