Header AD

समाज सेवेत अग्रेसर ब्रह्मांड कट्टा परिवाराने यावर्षी देखील जपले सामाजिक भान !
ठाणे, प्रतिनिधी  :  ब्रह्मांड कट्टा हा सांस्कृतिक व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहीला आहे. सामाजिक जाणीव  ठेवून नेहमीच मदतीचा हात पूढे करीत आलेला आहे. गेल्या वर्षी ग्रुपचा सभासद गायक मंगेश भोईर कोरोना ग्रस्त असताना सत्तर हजारांची मदत करुन संगीत कट्टयाच्या सभासदांनी त्याला आर्थिक विवंचनेतुन सोडवले तसेच जिवा वरच्या संकटा तुन ते वाचले. कले विषयी आसक्ती असल्याने उभरत्या कलाकारां साठी ब्रह्मांड कट्टा हा एक आधार स्तंभ ठरत आहे. 


              कोरोना काळात तर उदरनिर्वाहाच्या संकटाचे चटके सोसणार्‍या कलाकारांसाठी ब्रह्मांड कट्टा नेहमीच मायेची व मदतीची सावली होऊन भक्कमरित्या उभा आहे. अशा प्रकारे परत एकदा ब्रह्मांड कट्ट्याने माणुसकीचे दर्शन घडविले आहे. सौ.श्रध्दा देसाई व श्री.प्रमोद कांबळी  हे 'स्वरश्री प्रतिष्ठान' ही संस्था चालवत आहेत. अंध, अपंग, मतिमंद, मूकबधिर व कर्करोग पीडीतांच्या आर्थिक व शैक्षणिक मदती साठी सदर संस्था ही धर्मादाय आयुक्त मान्यता प्राप्त ट्रस्ट आहे.


            या ट्रस्टच्या  माध्य मातून 'आनंदयात्री' या नावाने अंध, अपंग, मतिमंद, मूकबधिर अशा कलाकारांना कला सादरी करणासाठी व्यासपीठ देऊन संपुर्ण देशात ही संस्था कार्यक्रम करीत असते. आता पर्यंत ७०० प्रयोग या संस्थेतर्फे झाले आहेत.या प्रयोगांचे माध्य मातून व देणगीतून संस्थेचा खर्च निभावला जातो. दिव्यांग असुनही आपल्या कलेच्या जोरावर उदरनिर्वाह व शैक्षणिक गरजा भागवणार्‍या मुलांचे प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगे आहेत. रसिक प्रेक्षकांच्या योग दानामुळे या संस्थेने इथवर यशस्वी रित्या प्रवास केला आहे. 


        मात्र कोरोना काळात कार्यक्रम पूर्णपणे थांबले असल्याने या दिव्यांग मुलांवर हाला खीची परिस्थिति आली आहे.आवश्यक असणारे अन्नधान्य, वैद्यकीय, शैक्षणिक व ईतर आवश्यक खर्च भागवताना संस्थेला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे  प्रतिपादन सौ. श्रध्दा देसाई व श्री.प्रमोद कांबळी यांनी केले होते. यासंबधी माहिती ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांना कळताच त्यांनी ताबडतोब संस्थेला मदत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली.


         आपल्या कार्यकारी समिती व सदस्यांच्या मदतीने त्यांनी जवळ जवळ २५००० रुपये रोख रक्कम  जमा केली. ही रक्कम जमा करण्यात ब्रह्मांड कट्टा अंतर्गत संस्था ब्रह्मांड संगीत कट्टयाचा सिंहाचा वाटा होता. अध्यक्ष अरुण दळवी काकांच्या मार्गदर्शना खाली संगीत कट्टयाच्या सदस्यांनी सढळ हस्ते मदत करत मोलाचे योगदान दिले. ब्रह्मांड संगीत कट्टयाच्या सदस्या सौ. तन्वी हुलावले यांनी अन्नधान्य व भाजीपाला या स्वरुपात मदत केली. 


           अशी भरघोस मदत ब्रह्मांड कट्टा परिवार तर्फे स्वरश्री प्रतिष्ठान मधील दिव्यांग मुलांना सुपूर्त केली गेली. कोरोनाने माणसा माणसांतील अंतर वाढवले परंतु मना मनातील अंतर कमी करा हा सुंदर मानवतेचा संदेश देणार्‍या संस्थापक श्री. राजेश जाधव यांनी जनतेला देखील या संस्थेला यथाशक्ति सहकार्य करण्याचे आवाहन केले व ब्रह्मांड कट्टयाने यावर्षी देखील पुनश्च सामाजिक भान ठेवत समाज कार्याचा ध्वज फडकवला!

समाज सेवेत अग्रेसर ब्रह्मांड कट्टा परिवाराने यावर्षी देखील जपले सामाजिक भान ! समाज सेवेत अग्रेसर ब्रह्मांड कट्टा परिवाराने यावर्षी देखील जपले सामाजिक भान ! Reviewed by News1 Marathi on April 23, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads