Header AD

आधारवाडी जेलमध्ये ३० कैद्यांना कोरोनाची लागण



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये कोरोनाने शिरकाव केला असून जेल मधील ३० कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आधारवाडी जेलमध्ये सध्या १९२२ कैदी असून यापैकी ३० कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.  या सर्व कैद्यांची तब्येत सध्या ठीक असून त्यांना उपचारासाठी ठाणे येथील सिविल हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असल्याची माहिती जेल अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.  


                सध्या वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी आधारवाडी जेलमधील ३५०  कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३० कच्च्या  कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व कैद्यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले असून कारागृहातील ४५  वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या कैद्यांचे कोवीड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. 


                तर कोवीड रुग्ण सापडल्यानंतर जेलमध्ये सॅनिटायजेशन करण्यात आले असून उर्वरित सर्व कैद्यांना पोषक आहार देण्यात येत आहे. तर एखाद्या कैद्याला थंडी - ताप आल्यास जेलमध्ये विलगीकरण कक्षही बनवण्यात आला असून कोरोनाची लक्षणे असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी ठेवण्यात येते. तसेच डॉन बोस्को शाळेमध्येही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून नविन कैद्यांना त्याठिकाणी ठेवले जात आहे. तसेच जेल मध्ये आज पासून लसीकरण प्रक्रिया देखील सुरु केली असल्याची माहिती जेल अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.

आधारवाडी जेलमध्ये ३० कैद्यांना कोरोनाची लागण आधारवाडी जेलमध्ये ३० कैद्यांना कोरोनाची लागण Reviewed by News1 Marathi on April 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads