एशियन पेंट्स कडून २०२१ साठी कलर ऑफ दि इअर 'चेरिश' सादर
राष्ट्रीय, ८ एप्रिल २०२१: वर्ष २०२१ नवचैतन्य आणि नवीन शुभारंभ करण्याचा उत्साह घेऊन आला असताना एशियन पेंट्स भारतातील कलर्स व डिझाइन ट्रेण्ड्सचा अंदाज देणारा सर्वात व्यापक उपक्रम कलरनेक्स्टचे १८वे पर्व सादर करत आहे. या पर्वामध्ये बहुप्रतिक्षित कलर ऑफ दि इअर – 'चेरिश'ची देखील घोषणा करण्यात आली.
कलर ऑफ दि इअर, चेरिश जीवनामध्ये आनंदाची भर करतो आणि आपल्याला आनंदमय अनुभव देतो. चेरिश (कलर कोड – आयवी लीग ७५८५) हा उत्साहपूर्ण, विनम्र व आकर्षक रंग आहे, ज्यामध्ये उबदारपणा व थंडाव्याचे उत्तम संतुलन आहे. यामधील मिंट ग्रीन शेड प्रगतीचे प्रतीक आहे, तर निळ्या रंगाची शेड व्यक्तीच्या मूडमध्ये उत्साहाची भर करते. हा रंग उत्साहपूर्ण आशा निर्माण करत उत्तम वातावरणाचा आनंद देतो. ही उत्साहपूर्ण व आकर्षक शेड पेंट्स, इंटिरिअर्स, टेक्सटाइल्स, आर्किटेक्चर किंवा उत्पादन डिझाइनसंदर्भात डिझाइनच्या सर्व पैलूंसाठी २०२१ मधील ट्रेण्ड-सेटर असणार आहे. या रंगामधून उत्साहपूर्ण व आनंददायी भावनेची निर्मिती होते.
रंग आणि भारतीयांच्या जीवनशैलीवर होणा-या त्यांच्या असंख्य परिणामांचा अभ्यास केल्यानंतर एशियन पेंट्स कलरनेक्स्टने २०२१ चे चार कलर ट्रेण्ड्स - हॅबिटट, ए होम न्यू वर्ल्ड, फेलिसिटी, झेड फ्यूचर्स देखील सादर केले आहेत. या ट्रेण्ड्सचा परिणाम दीर्घकालीन आहे आणि २००३ पासून भारतीयांची पसंती असलेले एकमेव रंग व डेकोर ट्रेण्ड्स आहेत. कलरनेक्स्टसह एशियन पेंट्सचा २०२१ मध्ये अनेक डिझाइन्सना प्रेरित करण्याचा मनसुबा आहे.
कलरनेक्स्टबाबत सांगताना एशियन पेंट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सिंगले म्हणाले, ''कलरनेक्स्ट ट्रेण्ड्स आणि कलर ऑफ दि इअरची दरवर्षाला अधिक उत्साह व अपेक्षेने वाट पाहिली जाते. इंटीरिअर डिझाइन, आर्किटेक्चर, प्रॉडक्ट डिझाइन, टेक्सटाइल व फॅशन, तसेच मार्केटिंग व तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध तज्ञ भारतीय ग्राहकांशी संलग्न होऊ शकणारे तसेच प्रोत्साहन व प्रभावांचा शोध घेणारे देश व विश्वाला मार्गदर्शन करतात. लॉकडाऊननंतरचे नवीन जीवन व वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन लक्षात घेत चार नवीन ट्रेण्ड्स विशेषरित्या डिझाइन करण्यात आले असले तरी चेरिश एक रंग म्हणून निश्चितच डिझाइन व ब्रॅण्ड मार्केटिंगच्या व्यापक व प्रभावी विश्वामध्ये धुमाकूळ निर्माण करेल.''
वर्ष २०२१ मध्ये आपण स्वत:ला आठवण करून देत आहोत की जीवन मौल्यवान आहे आणि प्रत्येक क्षण हा जीवनाचा आनंद घेण्यासाठी आहे. चेरिशचे महत्त्व सादर करणारा व्हिडिओ येथे पहा: https://www.youtube.com/watch?v=j1TKjxg-hy4

Post a Comment