Header AD

आदर्श विद्यालयात दररोज ५५० नागरिकांना लस

 

 डोंबिवली ( शंकर जाधव )  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे सरकारने लॉकडाऊन आणि  कडक निर्बंध लागू केले आहेत.तर दुसरीकडे जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचली जावी याकरता जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरू केले आहे. डोंबिवलीत लसीकरण केंद्रात लस टोचून घेण्यासाठी ४५ वर्षावरील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ येथील आदर्श विद्यालयात लसीकरण केंद्रात दररोज  ५५० नागरिकांना लस टोचली जाते.
                  यावेळी नागरिकांना सामाजिक अंतर आणि तोंडावर मास्क लावणे बंधनकारक केले आहे. ५ एप्रिल रोजी सुरु केलेल्या सदर केंद्रात माजी नगरसेवक मंदार हळबेमुकुंद ( विशु) पेडणेकर समाजसेवक राजेन ( राजू ) गाला,दिनेश जैनबाळा मोरेवसंत भगतकरण भगतअमित टेमकरस्वप्नील कांबळे,दुर्गेश कनोजिया,अरविंद रावण,वीरमणी अय्यरसमीर उजाळ,निलेश गावडे आदी अथक प्रयत्न करत आहेत. लसीकरणाचा वेग वाढला तर जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनापासून रक्षक मिळून शकेल.नागरिकांनी सरकारच्या म्हणण्यानुसार लस टोचून घेणे आवश्यक आहे असल्याचे माजी नगरसेवक मुकुंद ( विशु) पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.

आदर्श विद्यालयात दररोज ५५० नागरिकांना लस आदर्श विद्यालयात दररोज  ५५० नागरिकांना लस Reviewed by News1 Marathi on April 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads