Header AD

कल्याण डोंबिवलीत फक्त एकाच ठिकाणी होणार १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण


■कल्याण मधील आर्ट गॅलरी लसीकरण केंद्रावर व्यवस्था...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे देखील लसीकरण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात फक्त एकाच ठिकाणी हि लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. यामुळे या केंद्रावर मोठी गर्दी होण्याची शक्यता असून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून स्लॉट बुक केलेल्यांनाच या ठिकाणी लसीकरण करता येणार असल्याचे पालिकेने कळविले आहे.


कोरोना साथीच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महापालिका क्षेत्रातही सर्वत्र ४५ व त्यावरील वयोगटापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांचे तसेच फ्रंट लाईन वर्कर्स व हेल्थ वर्कर्स यांच्या लसीकरणाची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्टेट फॅमिली वेल्फेअर ब्युरोने आता राज्य शासनाकडून उपलब्ध होणा-या लसीच्या पुरवठयामधुन  १ मे पासून केवळ १८ ते ४४  वयोगटातील नागरिकांकरीता लसीकरण कार्यक्रम राबविण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. 



या सुचनांच्या अनुषंगाने कोविन पोर्टलवर "ऑनलाईन रजिस्ट्रेशन " करुन स्लॉट बुक केलेल्या केवळ १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच १ मे रोजी आर्ट गॅलरीलालचौकीकल्याण प. येथील लसीकरण केंद्रावर लसीकरणाची सुविधा दुपारी १२ ते सायं. ५ या वेळेत उपलब्ध होणार आहे. या वयोगटाव्यतिरिक्त इतर वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाची सुविधा महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवरकेंद्र शासनाकडून लसीचा साठा उपलब्ध होताच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती  पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. 


कल्याण डोंबिवलीत फक्त एकाच ठिकाणी होणार १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण कल्याण डोंबिवलीत फक्त एकाच  ठिकाणी होणार १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण Reviewed by News1 Marathi on April 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads