Header AD

भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली ; तीन मजुरांचा मृत्यू तर तीन जण जखमी





भिवंडी दि १६ (प्रतिनिधी  ) भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे . या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत .राजू उर्फ रणछोड प्रजापती ( वय ५० वर्ष ), भगवान मामा ( वय ५५ वर्ष ), मनसुख भाई ( वय ४५ वर्ष ) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांची नवे आहेत.
          
             
                 भिवंडी तालुक्यात काटई ग्राम पंचायत हद्दीत देवानंद कंपाउंड येथे हा धोकादायक यंत्रमाग कारखाना होता . कारखान्याच्या भिंती जीर्ण झाल्याने हा यंत्रमाग कारखाना मागील चार दिवसांपासून बंद होता व कारखान्याच्या जीर्ण झालेल्या भिंतींच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. गवंडी कामगार व मजुरांच्यामार्फत हे काम सुरु होते . 


             
             यावेळी भिंतीचे काम करण्यासाठी मजुरांनी परांची देखील बांधली होती. व त्यावर काम सुरु होते . मात्र हे काम सुरु असतांनाच लोखंडी अँगल व पत्राचा भार जीर्ण भिंतींवर पडल्याने भिंत कोसळली व त्यासोबतच छताचे लोखंडी अँगल व पत्रा देखील खाली कोसळला . या दुर्घटनेत तीन बांधकाम मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर तीन जण या दुर्घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत . या घटनेची नोंद निजामपूरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 
भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली ; तीन मजुरांचा मृत्यू तर तीन जण जखमी भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली ; तीन मजुरांचा मृत्यू तर तीन जण जखमी Reviewed by News1 Marathi on April 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads