Header AD

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर अपघात ; टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; एलपीजी टँकरही उलटला

भिवंडी दि. २४(प्रतिनिधी  )  दुचाकी स्वारास भरधाव एलपीजी गॅस टँकरची जोरदार धडक लागल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून गॅस टँकर देखील उलटला असल्याची घटना मुंबई नाशिक महामार्गावर सोनाळे गावच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी घडली आहे. उलटलेल्या एलपीजी गॅस टँकरमधून गॅस गळती होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून खबरदारीचा उपाय म्हणून या महामार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाकडून थांबविण्यात आली आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. 


              एलपीजी गॅस टँकर मुंबईहुन नाशिकच्या दिशेने जात असतांना सोनाळे गावच्या हद्दीत या टँकरने एका दुचाकीस्वाराला जोरदार ठोकर मारली व टँकरचालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने एलपीजी भरलेला गॅस टँकर पुढे जाऊन उलटला . या टँकरमधून गॅस गळती सुरु झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान टँकरचालक फरार झाला असून या अपघाताची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 


             तर गॅस टँकर उलटल्याने खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ अडवून ठेवल्याने महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर हलक्या वाहनांना पर्यायी रस्ता म्हणून मुंबई नाशिक महामार्गाच्या बाजूला असलेल्या पाईपलाईनच्या रस्त्यावरून हलकी वाहने सोडण्यात येत आहे. 
भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर अपघात ; टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; एलपीजी टँकरही उलटला भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर अपघात ; टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; एलपीजी टँकरही उलटला Reviewed by News1 Marathi on April 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads