Header AD

कल्याण पूर्वेत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांनी दिला १ कोटी आमदार निधी


■कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र....


कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवलीतील कोरोनाचा वाढता धोका ओळखून कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी  नागरिकांच्या हिताचा विचार करून एक करोड रुपये आमदार निधी मधून देऊन कल्याण पूर्वेत ऑक्सीजन प्लांट उभा करण्यासाठी सरसावले असून याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.


 कोरोनाच्या लढाईत ऑक्सिजन ही सर्वात महत्वाची गरज आहे. रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित होवून रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना राज्यात काही ठिकाणी घडलेल्या आहेत. येत्या काही दिवसांत ऑक्सिजनची कमतरता आणखी मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्याण पूर्वेतील दोन महानगरपालकेची कोरोना  रुग्णालये ऑक्सिजन पुरवठया अभावी अद्याप सुरू होवू शकलेली नाहीत. 


त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा बाबतीत महानगरपालिकेला आत्मनिर्भर बनविण्यासाठी भविष्यातील गरज लक्षात घेऊन कल्याण पूर्व भागात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यासाठी आमदार निधी मधून १ कोटी रुपयांचा निधी तातडीने वर्ग करण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना पत्राद्वारे केली आहे.

कल्याण पूर्वेत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांनी दिला १ कोटी आमदार निधी कल्याण पूर्वेत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांनी दिला १ कोटी आमदार निधी Reviewed by News1 Marathi on April 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads