Header AD

खासदार डॉ. श्रीकांत शिंदें कडून डोंबिवली पक्षी अभयारण्यासाठी ५००० लिटरच्या दोन टाक्या
डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पक्षी अभयारण्यमध्ये नैसर्गिक पाण्याचे तलाव जंगलाच्या खालच्या बाजूला असून जे वन विभागाने तयार केलेले तलाव आहेत ते आटले आहेत. जे काही छोटे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आहेत त्याचे पण पाणी संपायला लागले आहे. संपूर्ण जंगलात दरोरोज अनेक वृक्षप्रेमीनिसर्गप्रेमी झाडांची जोपासना करत असतातझाडांना पाणी देण्याचे काम जवळ जवळ ६ महिने सुरू असते आणि त्यांची देखभाल करत असतात.               पण उन्हाळा जसा सुरू झाला तस पाण्याचे दुर्भिक्ष जंगलात दिसू लागलेत्यामुळे पक्षी - प्राण्यांसाठी कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठे तयार करण्यात आले. पण  झाडांना पाणी देण्याचा आणि सदर विषय ह..प.सावळाराम महाराज वनराई संस्थेच्या सदस्यांनी खासदार डॉश्रीकांत शिंदे यांना सांगितला. खासदार डॉ. शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.२० एप्रिल २०२१ रोजी ह..प.सावळाराम महाराज वनराई संस्थेच्या सदस्यांनी जंगलामध्ये म्हाडाच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेवर चौथरा बांधून त्यावर ५००० लिटर क्षमतेच्या २ टाक्या बसविण्यात आल्या.            मुख्य टेकडीच्या बाजूला पाण्याच्या टाक्या बसवल्यामुळे जंगलाच्या वरच्या पठारावर असणाऱ्या सर्व झाडांना या पाण्यामुळे त्यांचे योग्यरीत्या संगोपन आणि संवर्धन होईल जे त्यांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरणार आहे. २१ एप्रिल २०२१ रोजी सकाळी निसर्गप्रेमी आणि शिवसेना कल्याण तालुका प्रमुख .प्रकाश म्हात्रे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.       या वेळी ह..प.सावळाराम महाराज वनराई संस्थेचे सर्व सदस्यनिसर्गप्रेमी आणि वृक्षप्रमी उपस्थित होते. धन्यवाद कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे  आपण या जंगलाला हरित ठेवण्यासाठी १०००० लिटर क्षमतेच्या टाक्या दिल्या. त्यामुळ सर्व निसर्गप्रेमींनी खासदार डॉ. शिंदे यांचे आभार मानले. 
           या जंगलात काम करणाऱ्या सर्व संस्था आणि ग्रामस्थांनी एकत्र मिळून या आपल्या हक्काच्या जंगलाचे संरक्षण,संवर्धन आणि संगोपन करूया. तसेच डोंबिवलीतील सर्व संस्था,राजकीय पक्षांनानिसर्गप्रेमींना विनंती आहे की आपण या वर्षी आपली आपल्या शहरासाठी जबाबदारी समजून एक झाड लावावे आणि त्याचे योग्यरीत्या संगोपन करावे.
           डोंबिवली शहराची लोकसंख्या साधारण १५ लाख आहे आणि प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड लावले तर या शहरात १५ लाख झाडं लावली जातील आणि जोपासली जातील. डोंबिवली शहराची असणारी प्रदूषित शहर ही ओळख आपल्यालाच बदलायची आहे आणि हरित शहर बनवायची आहे. एकच लक्ष डोंबिवली मध्ये १५ लाख नवीन वृक्षलावूया असे आवाहन निसर्गप्रेमी मंगेश कोयंडे यांनी केले आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदें कडून डोंबिवली पक्षी अभयारण्यासाठी ५००० लिटरच्या दोन टाक्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदें कडून  डोंबिवली पक्षी अभयारण्यासाठी ५००० लिटरच्या दोन टाक्या Reviewed by News1 Marathi on April 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads