Header AD

अमृत योजनेंतर्गत मुख्य जल वाहिनी टाकण्याच्या कामास वेग खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठ पुरव्याला यश
कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  केंद्र शासनाच्या सुचनेनुसार राज्यातील ४३ क्षेत्रांमध्ये सदर अभियान राबविण्यात येणार असून त्यापैकी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये देखील सदर योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार आता केंद्र शासन पुरस्कृत अमृत’ अभियानांतर्गत २७ गावांकरिता पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे.


हि अमृत योजना आपल्या मतदार संघात राबविण्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्यपूर्ण केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडे आग्रही मागणी करीत असून त्यास अखेर यश प्राप्त झाले व तसेच कामाला सुद्धा वेग मिळाला आहे. काही दिवांपूर्वीच या योजनेचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या हस्ते पार पडलेतसेच प्रत्यक्ष कामास गती प्राप्त झाली असून लवकरच काम पूर्ण करून ग्रामस्थांच्या सेवेत सदर अमृत योजना आणण्याचा मानस खा. डॉ. श्रीकांत शिंदे  यांनी दर्शविला आहे.


यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत या भागांकरिता ३३ जलकुंभ व त्यांना आवश्यक असलेल्या जलवाहिन्या व वितरण वाहिन्यांचा समावेश आहे. सदर योजनेअंतर्गत कल्याण - शीळ रस्त्यावर मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम अतिशय वेगाने सुरु आहे.


अमृत योजनेद्वारे २७ गावांमधील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाण्याचा साठा मिळणार असून तेही दिवस लांब नाहीत. यामुळे सदर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांचे कित्येक वर्षाचे स्वप्न साकार होत आहे. यासाठी समस्त ग्रामस्थांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानले आहे. तसेच खासदार शिंदे यांनी केंद्र व राज्य तसेच कल्याण डोंबिवली प्रशासनाचे आभार मानले.

अमृत योजनेंतर्गत मुख्य जल वाहिनी टाकण्याच्या कामास वेग खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठ पुरव्याला यश अमृत योजनेंतर्गत मुख्य जल वाहिनी टाकण्याच्या कामास वेग खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठ पुरव्याला यश Reviewed by News1 Marathi on April 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads