Header AD

लसीकरणा साठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरीक आणि अपंगांना रिक्षा चालकांची मदत


 डोंबिवली ( शंकर जाधव ) केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने ४५  वर्षावरील सर्व नागरिकांनचे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक मोफत लसीकरण सुरु केले आहे. लसीकरण करण्यासाठी घराबाहेर पडल्यावर लसीकरण केंद्रापर्यत जाताना रिक्षाचालक मदत करत आहेत.लसीकरणासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी कैलास सणस समाजसेवक यांच्या संकल्पनेतून मोफत लसीकरणमोफत रिक्षा प्रवास अभियान एक आठवड्यासाठी राबवले. 
            याची दाखल घेऊन  दखल घेऊनमैत्री फाऊंडेशनच्या वतीने सदर अभियानामध्ये सहभाग घेतलेल्या चारही रिक्षाचालक-मालक यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी रिक्षा युनियनचे अध्यक्ष अशोक लावणेमैत्री फाऊंडेशनचे सचिव अॅड प्रदीप बावस्करसाईश्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्षसमाजसेवक कैलास सणस आणि रिक्षा चालक-मालक व नागरिक उपस्थित होते. रिक्षा चालक मालक संघटना आणि कैलास सणस यांनी मैत्री फाउंडेशनचे व अॅड प्रदीप बावस्कर यांचे आभार मानले.

लसीकरणा साठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरीक आणि अपंगांना रिक्षा चालकांची मदत लसीकरणा साठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरीक आणि अपंगांना रिक्षा चालकांची मदत Reviewed by News1 Marathi on April 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads