Header AD

ट्रूक ने वायरलेस इअर बड्सची नवी श्रेणी लॉन्च केली


पॉवरफुल बॅटरी परफॉर्मन्स; भारतातील पहिले क्वाड एमईएमएस माईक ईएनसी सोल्युशन ~


मुंबई, २७ एप्रिल २०२१ : देशात संगीत क्षेत्रात उत्कृष्ट नूतनाविष्कार शोधणाऱ्या संगीतप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ट्रूक या हाय-क्वालिटी वायरलेस स्टिरिओ, वायरलेस हेडफोन्स, इअरफोन्स आणि साउंड प्रोफेशनल तसेच संगीत प्रेमींसाठी बीस्पोक अॅकोस्टिक इक्विपमेंट बनवणाऱ्या ऑडिओ ब्रँडने तीन नवी उत्पादने लाँच केली आहेत. अतिशय रचनात्मकरित्या कंपनीने वायरलेस इअरबड्स बड्स एस१, बड्स क्यू१ आणि फिट१ तयार केले आहेत. हे नेक्स्ट जनरेशनचे ट्रू वायरलेस इअरबड्स अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. 


ट्रूकचे बड्स एस१, बड्स क्यू१ आणि फिट१+ अत्याधुनिक ब्लूटूथ ५.१सह येतात. याद्वारे दुप्पट ट्रान्समिशन स्पीड, १.८एक्स रिलायबल कनेक्शन आणि दुप्पट एनर्जी इफिशिअन्सी मिळते. कानात फिट बसणारे इअर बड्स हे स्कीन फ्रेंडली असून त्यासोबत स्टायलिश मिनिएचर केस येतात. डोक्याची हालचाल झाली तरी ते पडत नाहीत, त्यामुळे बाहेर जाण्यासाठी ते उत्कृष्ट उपकरण आहे.


ट्रूक बड्स एस१: सिंगल चार्जवर १० तासांचा प्ले टाइम देणारे ट्रूक बड्स एस१ हे ५००एमएएच प्रीमियम स्लायडिंग केससह येतात. याद्वारे एकूण प्लेटाइम ७२ तासांचा मिळतो. संगीत प्रेमींसाठी याद्वारे शुद्ध शक्तीशाली साउंड मिळतो. यात १० एमएम ग्राफेन स्पीकर्स व एएसी कोडेक सपोर्ट असतो. यात युनिव्हर्सल टाइप-सी चार्जिंग इंटरफेस येतो. याद्वारे वन टच सुविधेसह रीच डिजिटल एलईडी डिस्प्ले मिळतो. नव्या इअरबड्समध्ये क्वाड एमईएमएस माईक ईएनसी  असून याद्वारे कॉलिंगचा उत्कृष्ट अनुभव मिळतो.


ट्रूकबड्स क्यू१: ट्रूक बड्स क्यू१ मध्ये ४०० एमएएच चार्जिंग केस असून याद्वारे फुल चार्जवर एकूण ६० तासांचा म्युझिक प्ले बॅक टाइम मिळतो. तसेच सिंगल चार्जवर १० तासांचा वेळ मिळतो. ही ब्लूटूथ ५.१ ची इन्स्टंट पेअरिंग टेक्नोलॉजी असून याद्वारे यूझरला स्थिर आणि फास्ट कनेक्शन मिळते. इअर बड्समधील ट्रू वायरलेसद्वारे १० एमएम डायनॅमिक ड्रायव्हर आणि एएसी कोडेक सपोर्टसह हाय फिडेलिटी साउंडची खात्री मिळते. यातदेखील क्वाड एमईएमएस माईक ईएनसी तंत्रज्ञान असून अत्यंत स्पष्ट कॉलिंगची सुविधा मिळते. या उत्पादनात लो लॅटन्सी गेमिंग मोडचीही सुविधा आहे.


ट्रूक फिट१+: थर्ड जनरेशन ट्रूक फिट१+ मध्ये सिंगल चार्जवर १२ तासांची म्युझिक प्लेबॅक क्षमता मिळते. ३०० एमएएच चार्जिंग केसमुळे इअर बड्सची एकूण म्युझिक प्लेबॅक क्षमता ४८ तासांपर्यंत मिळते. ब्लूटूथ ५.१ द्वारे स्थिर आणि फास्ट अखंड कनेक्शन मिळते. यात लो लॅटन्सी गेमिंग मोड आणि एएसी कोडेक सपोर्टची सुविधा असून यात वन टच कंट्रोल व डिजिटल डिस्प्लेदेखील आहे.


ट्रूकचे संस्थापक आणि सीईओ पंकज उपाध्यायम्हणाले, “मागील आठवड्यात मार्केटकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. एस१ आणि क्यू१ लाँच झाल्यापासून तीन दिवसातच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरील विक्री होणाऱ्या ऑडिओ प्रॉडक्टमध्ये टॉप १० एचओटी बनले आहे. ज्या दिवसापासून भारतीय बाजारात सुरुवात केली त्या दिवसापासून योग्य दृष्टीकोन आणि किंमतीसह दर्जेदार उत्पादने प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. १५०० रुपयांपेक्षा कमी श्रेणीत एस१ आणि क्यू१ ही उत्पादने लाँच करून आम्ही नवा बेंचमार्क प्रस्थापित केला असून आजवर तो कोणीही साध्य केलेला नाही.”

ट्रूक ने वायरलेस इअर बड्सची नवी श्रेणी लॉन्च केली ट्रूक ने वायरलेस इअर बड्सची नवी श्रेणी लॉन्च केली Reviewed by News1 Marathi on April 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads