Header AD

कोवीड रूग्णालयात आँक्सिजन सिलेंडर देत युवासेना व मदत फाँऊडेशनने जपली सामाजिक बाधंलिकी

    कल्याण  , कुणाल  म्हात्रे  : कोरोनाचा उद्रेक पाहता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडिसिव्हीर, ऑक्सिजन बेड, प्लाझ्मा या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव सुरु आहे. अनेकदा कोविड पेशंटसाठी बेड मिळतो पण ॲक्सिजन मिळत नाही. प्राणवायुमुळे अनर्थ होऊ शकतो हे लक्षात आल्यावर सामाजिक बांधलिकीतुन युवासेना सहसचिव तथा मदत फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.जयेश वाणी हे ऑक्सिजन सिलेंडरच्या शोधात होते. वासुंद्री येथे रहाणारे सुरेश जाधव यांनी त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असणारा भरलेला ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिला. शिवसेना शाखे जवळच्या आशिर्वाद कोविड सेंटरला हे सिलेंडर विनामुल्य उपलब्ध करुन दिले.


राजे गृपचे महेश एगडेयुवासेना सहसचिव ॲड.जयेश वाणीअमोल पाटील आणि सिध्देश चव्हाण यांच्या सामुहिक प्रयत्नातुन किमान एका ऑक्सिजन बेडची सोय झाली. येणाऱ्या १० दिवसात अशाच प्रकारे मांडा - टिटवाळ्यासाठी ऑक्सिजनची आणखी सोय करण्याचे प्रयत्न`मदत फाउंडेशन`च्या माध्यमातून सुरु आहेत. येणाऱ्या आठवड्यात मांडा- टिटवाळासाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर ही उपलब्ध होतील अशी माहिती युवासेना सहसचिव तथा मदत फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.जयेश वाणी यांनी दिली.

कोवीड रूग्णालयात आँक्सिजन सिलेंडर देत युवासेना व मदत फाँऊडेशनने जपली सामाजिक बाधंलिकी कोवीड रूग्णालयात आँक्सिजन सिलेंडर देत युवासेना व मदत फाँऊडेशनने जपली सामाजिक बाधंलिकी Reviewed by News1 Marathi on April 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads