Header AD

स्मशान भूमीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात


■कोणत्याही सुरक्षा साधनां शिवाय उचलावे लागतात पिपिई कीट....


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या कोरोना रूग्णांसह मृतांचा आकडा देखील वाढत असून या मृतांवर विविध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. हे करतांना मृतदेह हाताळणारयांकडून वापरण्यात आलेले पिपिई कीट कोणतीही विल्हेवाट न लावता त्याठिकाणी उघड्यावर टाकण्यात येत असल्याने हे पिपिई कीट सफाई कामगारांना उचलावे लागत असून यामुळे या सफाई कर्मचाऱ्यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे.

        

              कोरोनाच्या सुरवातीच्या काळापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सफाई कर्मचारी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. शहरातील रस्त्यांची नियमित साफसफाई करणे, कचरा कुंड्यांमधील कचरा उचलणे, इतरत्र असलेला कचरा गोळा करणे आदी महत्त्वाची कामे करून शहर स्वच्छतेकडे भर देत आहेत. हे करत असतांना स्मशानभूमीतील कचरा गोळा करतांना त्यांना त्याठिकाणी टाकलेले पिपिई कीट देखील कोणत्याही सुरक्षाविषयक साधनांशिवाय उचलावे लागत आहेत.


पिपिई कीट हे बायोमेडिकल वेस्ट प्रकारात येत असल्याने त्यांची विल्हेवाट हि विशेष खबरदारी घेऊन विशिष्ट पद्धतीने हाताळणे आवश्यक आहे. शिवाय हे बायोमेडिकल वेस्ट प्रक्रिया केंद्रात जमा करणे आवश्यक आहे. हे काम मेडिकल डिपार्टमेंटच आहे. असे असतांना हे पिपिई कीट इतर कचऱ्या सोबत डम्पिंग ग्राउंडला टाकण्यात येत आहे.  याबाबतचे कोणतेही प्रशिक्षण या सफाई कर्मचाऱ्यांना दिले जात नाही. यामुळे सफाई कामगार आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.


सफाई कर्मचारी जीवाची पर्वाकुटूंबाची पर्वा नकरता आपले कर्तव्य पार पाडतात. परंतु प्रशासन त्याच्या जीवाशी खेळत असून  त्यांना  कोणत्याही प्रकारचे सुरक्षा विषयक साधने पुरवली जात नाहीत. सॅनिटायझर दिले जात नाहीत, मास्क पुरवले जात नसल्याचा आरोप या सफाई कर्मचाऱ्यांनी केला आहे.


आम्हाला सुद्धा परिवार आहेआमची सुद्धा लहान मुलं आहेत. सफाईचे महत्त्वपूर्ण काम करत असतांना देखील अद्याप सफाई कामगार लसीकरणापासून वंचित आहेत. लसीकरण कुठे करायचं हे बऱ्याचशा सफाई कामगारांना माहिती नाही. रुक्मिणीबाई हॉस्पिटल मध्ये गेलो तर तेथे वरिष्ठ नागरिकांना लसीकरण आहे असं सांगितलं जातं. आमचे आरोग्य निरीक्षक तर कोणतीच माहिती आम्हाला देत नाहीत फक्त्त कामच सांगत आहेत. तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल अस सांगितलं जातं असल्याचे या सफाई कामगारांनी सांगितले.


 दरम्यान याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणात योग्य त्या सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य निरीक्षांकाना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

स्मशान भूमीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात स्मशान भूमीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात Reviewed by News1 Marathi on April 21, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads