Header AD

सुभाष भोईर फाउंडेशनच्या वतीने दोन हजार स्टीमरचे वाटप

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  युवासेना कळवा- मुंब्रा अधिकारी सुमित सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त सुभाष भोईर फाउंडेशनच्या वतीने  कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात दोन हजार स्टीमरचे वाटप करण्यात आले.


सुमित भोईर हे दरवर्षी आपला वाढदिवस विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून साजरा करीत असतात. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने घरगुती वाढदिवस साजरा करीत असताना सामाजिक हिताची जाणीव ठेऊन सुभाष भोईर फाउंडेशनच्या वतीने मतदार संघात स्टीमरचे वाटप करण्यात आले.


त्यामध्ये,डायघर , मानपाडा, रामनगर, टिळकनगर, मुंब्रा, दिवा,कळवा पोलीस स्टेशन तसेच मुंब्रा व डोंबिवली वाहतूक शाखा, मतदार संघातील विविध बँकेचे कर्मचारी, पोस्टमन,  मुंब्रा, शिळ, निळजे, आजदे, दत्तनगर, डोंबिवली व शास्त्रीनगर येथील आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी व विविध सोसायट्यांमध्ये आणि ज्येष्ठ  नागरिकांना स्टीमरचे वाटप करण्यात आले.

सुभाष भोईर फाउंडेशनच्या वतीने दोन हजार स्टीमरचे वाटप सुभाष भोईर फाउंडेशनच्या वतीने दोन हजार स्टीमरचे वाटप Reviewed by News1 Marathi on April 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads