Header AD

पैसे घेऊन निगेटिव्ह रिपोर्ट देत असल्याचा मनसेचा आरोप

 

■टिटवाळयातील आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर टेस्टचा काळा बाजार ?


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  टिटवाळयात कोरोच्या आरटीपीसीआर टेस्टचा काळाबाजार होत असल्याच्या धक्कदायक प्रकाराची मनसेने भांडाफोड केली आहे. टिटवाळा येथील पालिकेच्या आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांची तपासणी केंद्र सुरु आहे. येथील अनेक रुग्णांची या ठिकाणी रोजच्या रोज तपासणी केले जाते. मात्र याच ठिकाणी पैसे घेऊन निगेटिव्ह असल्याचे रिपोर्ट देत असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला असून टिटवाळा उपविभाग अध्यक्ष धनंजय पाटील यांनी या प्रकारची  भांडाफोड केली आहे.


टिटवाळा येथील एक रिक्षा चालक येथील आरोग्य केंद्रात आपली आरटीपीसीआर टेस्ट करण्यसाठी गेलेला असताना त्याला इथे रिक्षाचालकांची टेस्ट केली जात नाही असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर पैसे देण्याची गोष्ट केल्यानंतर रिपोर्ट मिळेल असे सांगण्यात आले. मात्र याची पावती रिक्षाचालकाने मागितली असता ती देण्यास नकार देण्यात आला याबाबतची तक्रार रिक्षाचालकाने मनसेचे टिटवाळा उपविभाग अध्यक्ष धनंजय पाटील यांच्याकडे केली. यानंतर त्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन याबाबत विचारणा केली असता सदर टेस्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यानी असा प्रकार होत नसल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी मनसेचे धनंजय पाटील आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आक्रमक पवित्र घेतल्यानंतर झाल्या प्रकराची कर्मचा-र्यानी कबुली देत माफी मागत या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.


 मात्र हे प्रकरण मिटते ना मिटते तोच असे पैसे घेऊन टेस्ट रिपोर्ट बनवून देण्याचे अनेक प्रकार होत असल्याचे अनेक फोन धनंजय पाटील यांच्याकडे नाव न सांगण्याच्या अटीवर आले आहेत. तर काही राजकीय नेत्यांनी आपले राजकीय वजन वापरत इन्शुरन्स पास करण्यासाठी पॉझीटीव्ह रिपोर्ट बनवून घेतल्याची माहिती देखील मनसेचे धनंजय पाटील यांच्याकडे आली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकारची सखोल चैकशी व्हावी व नागरिकांच्या जीविताशी चालू असलेला हा खेळ थांबवावा अशी मागणी मनसेच्यावतीने धनंजय पाटील यांनी केली आहे. तर याबाबत टिटवाळा आरोग्य अधिकारी डॉ. तृणाली महातेकर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊवू शकला नाही.

पैसे घेऊन निगेटिव्ह रिपोर्ट देत असल्याचा मनसेचा आरोप पैसे घेऊन निगेटिव्ह रिपोर्ट देत असल्याचा मनसेचा आरोप Reviewed by News1 Marathi on April 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads