Header AD

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पालिका रुग्णालयातील लसीकरण केंद्र स्थलांतरीत रुक्मिणी बाई रुग्लायातील केंद्र गुरुनानक शाळेत


■तर शास्त्रीनगर रुग्णालयातील केंद्र स्वामी विवेकानंद शाळा आणि राजाई टॉवरनजीक  स्थलांतरित...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या वाढत्या रूग्णांमुळे पालिका रुग्णालयात सुरु असलेली कोरोना लसीकरण केंद्रे इतरत्र हलविण्यात आली आहेत.

      

                   कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच रुक्मिणीबाई रुग्णालयात संशयित कोरोना रूग्णांसाठी देखील स्वतंत्र वार्ड सुरु करण्यात आला आहे. यामुळे लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणताही अडथळा येऊ नये तसेच संशयित कोरोना रूग्णांमुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी पालिका रुग्णालयातील लसीकरण केंद्र इतरत्र हलविण्यात आले आहेत.


              रुक्मिणीबाई रुग्णालयातील लसीकरण केंद्र हे कल्याण पश्चिमेतील रामबाग येथील गुरुनानक शाळेत स्थलांतरीत केले आहे. तर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील लसीकरण केंद्र हे सोमवार ते बुधवार स्वामी विवेकानंद शाळा, दिनदयाल रोड येथे आणि गुरवार ते शनिवार राजाई टॉवरनजीक, कोपररोड येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. लसीकरण केंद्र स्वतंत्र ठिकाणी हलविण्यात आल्याने पालिकेच्या रुग्णालयात कोरोना संसर्गाची भीती नागरिकांना वाटणार नाही.


               दरम्यान आज अचानक रुक्मिणीबाई रुगालायातील लसीकरण केंद्र गुरुनानक शाळेत हलविल्याने सकाळी याठिकाणी नियोजन करतांना प्रशासनाची चांगलीच भांबेरी उडाली. या केंद्रावर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पालिकेचा कर्मचारीवर्ग अपुरा असल्याने झालेली गर्दी नियंत्रणात आणणे कठीण झाले होते. यावेळी स्थानिक मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना मदत करत गर्दीचे नियोजन केले. तसेच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था केल्याची माहिती मनसेचे रामबाग शाखा अध्यक्ष मिलिंद चौधरी यांनी दिली.     

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पालिका रुग्णालयातील लसीकरण केंद्र स्थलांतरीत रुक्मिणी बाई रुग्लायातील केंद्र गुरुनानक शाळेत वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पालिका रुग्णालयातील लसीकरण केंद्र स्थलांतरीत रुक्मिणी बाई रुग्लायातील केंद्र गुरुनानक शाळेत Reviewed by News1 Marathi on April 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

खड्ड्यात पडून शिवसेना शाखा प्रमुख जखमी...

  डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली शहरात रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रशासनावर नागरिक नाराजी व्यक्त करत असताना खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी  हो...

Post AD

home ads