Header AD

बैल बाजार येथील डीझेल शव दाहिनी दुरुस्त करण्याची मनसेची मागणी




कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कोरोना महामारीमुळे कल्याण डोंबिवली शहरांत मृतांचे प्रमाण वाढले असून त्यातच बैल बाजार स्मशानभूमीतील डीझेल शव दाहिनी वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांची हि गैरसोय टाळण्यासाठी हि डीझेल शवदाहिनी चांगल्याप्रकारे दुरुस्त करण्याची मागणी मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.


कल्याण पश्चिमेतील बैल बाजार येथील मोक्षधाम मधील डिझल शव दाहिनी वारंवार बंद पडत असल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मागील एक महिन्यात जवळ - जवळ दहा ते बारा वेळा डिझल शव दाहिनी बंद झाली. नाइलाजाने लोकांना लाकूड खरेदी करावे लागले. लाकडे खरेदी करण्यासाठी अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना रांगेत तासंतास उभे राहावे लागत आहे. तसेच बरच वेळ शव दहन स्टॅन्ड रिकामा नसल्यामुळे शव दहन प्रक्रिया उशीराने होत आहेत.


कोरोना महामारी सुरु असल्यामुळे लोक शव जास्त वेळ ठेऊ शकत नाही. यामुळे नादुरुस्त डिझल शव दाहिनी कडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर शव दाहिनी दुरुस्त करण्याची मागणी मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी केली आहे.

बैल बाजार येथील डीझेल शव दाहिनी दुरुस्त करण्याची मनसेची मागणी बैल बाजार येथील डीझेल शव दाहिनी दुरुस्त करण्याची मनसेची मागणी Reviewed by News1 Marathi on April 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads