Header AD

रेमडीसीवीर इंजेक्शन अभावी रुग्णांच्या जीवाशी खेळ - किरीट सोमय्या


 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  ;  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली तील  सावळाराम कोवीड रुग्णालयाला भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज अचानक भेट देत पाहणी केली. याठिकाणी असणारी ऑक्सिजन व्यवस्थारेमडीसीविर इंजेक्शनचा साठा,इकडची बेड व्यवस्था आदींची सोमय्या यांनी पाहणी करत माहिती घेतली.



यावेळी  कोवीड रुग्णांना आवश्यकतेपेक्षा अत्यंत कमी रेमडीसीविर इंजेक्शन मिळत असल्याचे आपल्याला  पाहणीत आढळून आल्याचे सांगत. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून रेमडीसीवीर अभावी रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याची टिका त्यांनी उद्धव ठाकरे सरकारवर  केली.



           डोंबिवलीतील महापालिकेच्या कोवीड रुग्णालयात दाखल रुग्णांवर  योग्य उपचार होत नसल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. त्या तक्रारीनुसार आपण आज याठिकाणी पाहणी केली. त्यामध्ये इकडील ऑक्सिजन पुरवठ्याच्या व्यवस्थेबाबत सोमय्या यांनी समाधान व्यक्त केले. तर महापालिका रुग्णालयांना होणाऱ्या रेमडीसीविर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत मात्र त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

रेमडीसीवीर इंजेक्शन अभावी रुग्णांच्या जीवाशी खेळ - किरीट सोमय्या रेमडीसीवीर इंजेक्शन अभावी रुग्णांच्या जीवाशी खेळ  -  किरीट सोमय्या Reviewed by News1 Marathi on April 26, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads