Header AD

मरणा नंतरही भोग सरेना कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्व कब्रस्थानचा दफन विधीला नकार
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण मध्ये एका व्यक्तीच्या  मृत्यू नंतर त्याची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलीया व्यक्तीच्या दफन विधीसाठी शेजाऱ्यांना चार तास वणवण फिरावे लागलेकारण एकही कब्रस्थान दफन विधी करण्यास तयार नव्हतेअखेर मीडिया मध्ये हे प्रकरण पोहचताच एका कब्रस्थानने त्यांच्या वर दफन विधी करण्यास तयारी दाखवलीया घटने मुळे माणुसकी खरंच शिल्लक राहिली की नाहीअसा प्रश्न उपस्थित केलाजातोय.


कल्याणच्या वालधूनी परिसरात राहणारे एक व्यक्ती काही महिन्यांपासून किडणीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची पत्नी आणि चार वर्षाचा मुलगा असा त्यांचा परिवार आहे. रात्री त्यांना जास्त त्रास झाल्याने त्यांची पत्नी त्यांना महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आली. त्यावेळी त्यांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोविड टेस्ट रिपार्ट पॉझीटीव्ह आला. मात्र,याच कारणावरुन त्यांच्या दफनविधीला कल्याणमधील तीनही कब्रस्थानने नकार दिला.


मृतक व्यक्तीच्या शेजारी राहणारे नासीर शेख यांना देखील प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं. अंत्यविधीसाठी मृतदेह आधी रुग्णवाहिका चालकाने स्मशानभूमीत नेला. त्याठिकाणी जागा नव्हती. त्यानंतर चालकाच्या लक्षात आले की रुग्ण मुस्लीम आहे. त्याला कब्रस्थानला न्यावे लागल. गोंधळलेल्या परिस्थितीत त्याने मृतदेह पुन्हा रुक्मीणीबाईला आणला. 


सकाळी त्याचे शेजारी नासीर आणि काही लोक पोहचले त्यांनी मृतदेह घेऊन दफनविधीसाठी तीन कब्रस्थान फिरले. कल्याणच्या टेकडी कब्रस्थानमध्ये सांगण्यात आले कीआमच्या इथे नाही होणार. दुसरीकडे न्या. दुसऱ्याने तिसऱ्याकडे बोट दाखविले. तिसऱ्याने पुन्हा टेकडी कब्रस्थानचे नाव सांगितले.


चार तास नासीर आणि त्याचे मित्र मृतदेह घेऊन फिरत होते. पुन्हा मृतदेह रक्मीणबाई रुग्णालयात आणली. हे प्रकरण मीडियाकडे गेल्याचे कळताच शहाड येथील एका कब्रस्थानने त्या व्यक्तिच्या मृतदेहावर दफनविधी करण्याची तयारी दाखविली. जीवन जगताना सामान्यांना प्रत्येक गोष्टीसाठी वणवण करावी लागते. मृत्यूनंतरही त्यांच्या नशीबातील वणवण संपत नाही हीच धक्कादायक बाब या घटनेतून समोर आली आहे.

मरणा नंतरही भोग सरेना कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्व कब्रस्थानचा दफन विधीला नकार मरणा नंतरही भोग सरेना कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्व कब्रस्थानचा दफन विधीला नकार Reviewed by News1 Marathi on April 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads