Header AD

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विविध प्रभागक्षेत्रात दुकाने सील करण्याची धडक कारवाई

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील बाबी वगळून इतर सर्व आस्थापना ३०  एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केल्यानंतरही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे  महापालिकेच्या प्रभागक्षेत्रात काही दुकाने व मॅरेज लॉन्स या पूर्वी सील करण्यात आले होते. 



                आजही या  आदेशाच्या अनुषंगाने  क प्रभागात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे यांनी झुंझाराव मार्केट मधील सुरू असलेली ४ दुकाने आणि लक्ष्मी मार्केट मध्ये सुरू असलेले १ दुकान आज सील केले. त्याचप्रमाणे बाजापेठेत सुरु असलेली साड्यांची २ दुकाने सील केली.

             
                आय प्रभागातही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांनी नंदिवली रोड येथील सुरू असलेले १ इलेक्ट्रिक दुकान व १ भांड्याचे दुकान सील करण्याची धडक कारवाई आज केली.
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विविध प्रभागक्षेत्रात दुकाने सील करण्याची धडक कारवाई नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विविध प्रभागक्षेत्रात दुकाने सील करण्याची धडक कारवाई Reviewed by News1 Marathi on April 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी.. अन्यायकारक जी. आर.ची होळी करण्याचा ईशारा

डोंबिवली ( शंकर जाधव ) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता रयत क्रांती संघटनेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आह...

Post AD

home ads