Header AD

केडीएमसीच्या कोविड नियंत्रणा साठी आढावा बैठक घेण्याची मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोविड नियंत्रण व उपाययोजनांसाठी तातडीने आढावा बैठक घेण्याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोविड रुग्णसंख्या दिवसेदिवस वाढत आहे. दररोज दिड हजार पेक्षा जास्त रुग्ण सापडत असून सध्या कार्यरत असलेल्या सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. तसेच रेमडेसिवरसह इतर औषधांचा तुटवडा असून आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. त्यातच महानगरपालिकेचा कालावधी संपल्यामुळे वेगवेगळ्या प्रभागात प्रतिनिधीत्व करीत असलेल्या नगरसेवकांचाही कालावधी संपलेला आहे. त्यामुळे महानगरपालिकेची संपूर्ण जबाबदारी आयुक्तांवर असून कोविड परिस्थिती,महानगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सोयी-सुविधापावसाळा पूर्व कामे अशा सर्वच जबाबदाऱ्या असल्याने त्यांच्यावरही अतिरिक्त ताण वाढत आहे.


राज्यात इतरही जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्ण वाढत आहेत. अशावेळी तेथील पालकमंत्रीजिल्हाधिकारी, आयुक्तपोलीस प्रशासन यांच्यामध्ये संयुक्त बैठका होत आहेत. त्यामध्ये सध्याच्या कोविड परिस्थितीसह भविष्यातील उपाययोजनांबाबत आढावा घेतला जात आहे. परंतु कल्याण-डोंबिवली व इतर लगतच्या शहरांच्या बाबतीत होताना दिसत नाही. आजची परिस्थिती पाहता स्थानिक नागरिक कोरोनाच्या दहशतीत असून कोविड ग्रस्तांना बेड उपलब्ध होताना दिसत नाहीत. लसीकरणाचे प्रमाणही कमी असून नागरीक भयभीत व कोरोनाच्या दहशतीखाली आहेत.


पालकमंत्री या नात्याने कल्याण-डोंबिवली क्षेत्रातील कोविड परिस्थिती व मुलभूत सोयी सुविधांच्या उपाययोजनांसाठी आढावा बैठक आयोजित करावी. सध्याच्या उद्भवलेल्या परिस्थितीवर युद्धपातळीवरउपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.


केडीएमसीच्या कोविड नियंत्रणा साठी आढावा बैठक घेण्याची मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र केडीएमसीच्या कोविड नियंत्रणा साठी आढावा बैठक घेण्याची मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले पत्र Reviewed by News1 Marathi on April 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads