Header AD

कोव्हीड १९ लसीकरण मोहीम घेऊ या कोरोना लस साथी ने, करूया मात कोरोनावर एकजुटीने "




ठाणे , प्रतिनिधी  ; शनिवारी  दि २४ एप्रिल रोजी भाजपा ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष व कोकण पदवीधर मतदार संघांचे आमदार श्री. निरंजन डावखरे व ठाणे शहर आमदार श्री. संजय केळकर ह्यांच्या मार्गदर्शना खाली ठा.म.पा. प्रभाग क्र. ४ च्या नगरसेविका सौं. स्नेहा रमेश आंब्रे व भाजपा ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्ष श्री. रमेश बा. आंब्रे ह्यांच्या नियोजनाने प्रभाग क्र. ४ मधील व प्रभागाच्या बाहेरील ४५ वर्षावरील स्थानिक नागरिक व ज्येष्ठ नागरिकांना ठाणे महानगरपालिका गांधीनगर आरोग्य केंद्र, गांधीनगर येथे सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून कोव्हीड १९ लसीकरण करण्यात आले. राजकारण नव्हे हे तर निःस्वार्थ समाजकारण होय. नागरिकांच्या हितासाठी प्रभागाच्या बाहेरील नागरिकांचे देखील कोव्हीड १९ लसीकरण करण्यात आले.


         ह्यावेळी भाजपा ठाणे शहर (जिल्हा) श्री. रमेश बा. आंब्रे व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून सहकार्य केले. कोव्हीड १९ लसीकरण नाव नोंदणी व मार्गदर्शन सहाय्य केल्याबद्दल स्थानिक नागरिक व ज्येष्ठ नागरिकांनी नगरसेविका सौं. स्नेहा(ताई) रमेश आंब्रे व श्री. रमेश बा. आंब्रे तसेच ठाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय पथक ह्यांचे मनापासून आभार मानले. 


कोव्हीड १९ लसीकरण मोहीम घेऊ या कोरोना लस साथी ने, करूया मात कोरोनावर एकजुटीने " कोव्हीड १९ लसीकरण मोहीम घेऊ या कोरोना लस साथी ने, करूया मात कोरोनावर एकजुटीने " Reviewed by News1 Marathi on April 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads