Header AD

एकीकडे पाणी कपात तर दुसरीकडे पाण्याची नासाडी

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  उल्हास नदी पाण्याचे नियोजन करण्यासाठीकल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकीकडे पाणी कपात केली जात आहे तर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुसरीकडे पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ६ आणि२० एप्रिल या दोन दिवसांकरीता २४ तासांकरीता पाणी पुरवठा बंद राहणार आहे. गेल्या दोन महिन्यापासून पाणी कपात केली जात आहे. असे असतानाकेडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरणातून पाणी पुरवठा करणा:या जलवाहिनीचा व्हॉल्व तुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. नादुरुस्त व्हॉल्वमुळे पाण्याचा फवारा उंचावर उडत होता. त्या पाण्यात स्थानिक तरुण अंघोळीचा आनंद लूटत होते तर काही रिक्षा चालक त्यांची रिक्षा धूवत आहे.याबाबत महापालिकेचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी सांगिले कीसध्या पाणी पुरवठा बंद करुन दुरुस्तीचे काम सुरु असून लवकरच दुरुस्तीचे काम केले जाईल. 

एकीकडे पाणी कपात तर दुसरीकडे पाण्याची नासाडी एकीकडे पाणी कपात तर दुसरीकडे पाण्याची नासाडी Reviewed by News1 Marathi on April 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads