Header AD

तब्बल बारा वर्षानंतर नवी मुंबई शहराची वाहतुक कोंडी सुटणार;


■खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नातून ऐरोली - घणसोली दरम्यान उड्डाण पुलाची उभारणी....


नवी मुंबई , प्रतिनिधी : एकीकडे नवी मुंबईत होणाऱ्या वाढत्या शहरीकरणामुळे वाहतुक कोंडीच्या समस्यांनी येथील नागरीकांची पुरती दमछाक झाली आहे. मात्र, या गंभीर समेस्येचे निराकरण करण्यासाठी शिवसेना खासदार राजन विचारे यांनी दि २९ मे २०१८ रोजी जागेची प्रत्यक्ष पाहणी करून पाठपुरावा केला आहे. येथील पर्यायी रस्त्याची लागणारी आवश्यकता लक्षात घेता खासदार राजन विचारे यांनी गेल्या बारा वर्षांपासून अपूर्णावस्थेत असलेल्या घणसोली - ऐरोली जोडरस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला गती करण्यासाठी दि 24 डिसेंबर 2020 रोजी माननीय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी व महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सदर काम गतीमान झाले आहे. 



अंतिम टप्प्यातील पर्यावरण विभागाच्या परवानगी मिळण्याच्या प्रतिक्षेत असून याची पाहणी आज खासदार राजन विचारे यांनी अधिकारयाच्या समवेत केली. त्यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर,सिडकोचे मुख्य अभियंता डायटकर, कांदळवनाचेए सी एफ राज्रेंद्र मकदूम, उप मुख्य वनसंरक्षकअधिकारी गजेंद्र हिरे, कार्यकारी अभियंता संजय देसाई, अरविंद शिंदे, तसेच जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, विरोधीपक्ष नेते विजय चौगुले, उपजिल्हा प्रमुख मनोज हळदणकर, अतुल कुलकर्णी, प्रकाश पाटील, शहर प्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, उप शहर प्रमुख अनिल पाटील, एकनाथ भूखंडे, नगरसेवक एम. के. मढवी, चेतन नाईक, आकाश मढवी, रमाकांत म्हात्रे, विलास भोईर, इतर शिवसेना पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.



सिडकोने नवी मुंबई शहर बसविताना बेलापूर ते ऐरोली असा 21.15 किमी लांबीचा पामबीच रस्ता नियोजित केलेला होता. परंतु,19.20 किमी लांबीचा रस्ता सिडकोने सन 2009 पर्यंत घणसोली पर्यंत पूर्ण केला. त्यापुढील भागात कांदळवन असल्याने MCZA,CRZ पर्यावरण व इतर प्राधिकरणाकडे मंजुरी मिळत नसल्याने 1.94 किलोमीटर लांबीचा केबल ब्रीज बांधण्याचा प्रस्ताव नवीमुंबई महानगर पालिकेने मांडला. सदर प्रकल्पासाठी 800 कोटी खर्च अपेक्षित असल्याने एवढा मोठा खर्च महापालिका पेलू न शकल्याने तो प्रस्ताव  रद्द करण्यात आला होता,त्यासाठी खासदार राजन विचारे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची १० जून २०१९ ला भेट घेऊन सदर पुलासाठी अनुदान सिडकोने देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. परंतु याची अंमलबजावणी न केल्याने या कामाला गती मिळत नसल्याने  मा.खासदार राजन विचारे यांच्या विनंतीनुसार दि २४ डिसेंबर 2020 रोजी माननीय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करुन या सदर कामाला गतीदेण्याचे प्रशासनाला आदेश दिले त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने जुन्या प्रस्तावाप्रमाणे १.९४ किलोमीटर असलेला पूल ३.२ किलोमीटर लांबीचा प्रस्ताव बनवून सदर पूल मुलुंड – एरोली टोल मार्गावरच्या एरोली – कटाई या पुलाला जोडण्याचा प्रस्थापित केला आहे. 


या पुलासाठी ३७२ कोटी रक्कम खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे हा प्रादेशिक नवीन लिंक मार्ग होणार आहे. नवी मुंबईतील वाहतूककोंडी फुटणार असून याचा फायदा मुंबई, ठाणे, कल्याण –डोंबिवली येथील प्रवाश्यांनाही होणार आहे. खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबई शहराच्या विकासासाठी ज्यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, महापालिका आयुक्त अभिजितजी बांगर, सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, एम एम आर डी ए आयुक्त, आर ए राजीव साहेब, या सर्वांचे आभार मानले.

तब्बल बारा वर्षानंतर नवी मुंबई शहराची वाहतुक कोंडी सुटणार; तब्बल बारा वर्षानंतर नवी मुंबई शहराची वाहतुक कोंडी सुटणार; Reviewed by News1 Marathi on April 01, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के

ठाणे  , प्रतिनिधी  :   गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी...

Post AD

home ads