Header AD

मुब्रा येतील प्राईम क्रीटी केअर रुग्णालयातील आगीत मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना पालिकेकडून 5 लाखाची मदत


■रुग्णालयाला भेट दिल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा / ठाण्यातील सर्व रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट पूर्ण करण्याचे  आयुक्तांना निर्देश...


ठाणे ,  प्रतिनिधी  :-  मुंब्रा येथील प्राईम क्रीटीकेअर रुग्णालयात काल मध्यरात्री अचानक आग लागल्याने त्यात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना मुख्यमंत्र्यांनी 5 लाखाची आणि जखमींना 1 लाखाची मदत जाहीर केली होती. आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी भेट देऊन या रुग्णालयाची पाहणी केली. , त्यानंतर त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मृत व्यक्तीना अतिरिक्त 5 लाख रुपयांची मदत जाहीर जाहीर केली. 


मुंब्रा येथील रुग्णालयात रात्री 3 वाजता लागलेल्या आगीत अनेक रुग्ण मृत्युमुखी पडले असते. मात्र  आग लागल्याचे समजताच तत्काळ या रुग्णाना इतरत्र हलवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. प्राथमिक पाहणीनुसार ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असल्याचा अंदाज आहे. तसच ही आग आयसीयू मध्ये लागली नव्हती मात्र रुग्णांना हलवताना श्वास गुदमरून या चार जणांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. 


रुग्णालयातील या आगीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठीच प्रत्येक रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट लवकरात लवकर करण्याचे निर्देश श्री.शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा याना दिलेले आहेत. तसेच ही आग नक्की कशामुळे लागली याचा शोध घेण्याचे देखील आदेश संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री श्री शिंदे यांनी दिलेले आहेत.

मुब्रा येतील प्राईम क्रीटी केअर रुग्णालयातील आगीत मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना पालिकेकडून 5 लाखाची मदत मुब्रा येतील प्राईम क्रीटी केअर रुग्णालयातील आगीत मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना पालिकेकडून 5 लाखाची मदत Reviewed by News1 Marathi on April 28, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads