Header AD

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के
ठाणे  , प्रतिनिधी  :  गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी लिंडे कंपनीकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे लिंडे कंपनीने 15 टन ऑक्स‍िजन उपलब्ध करुन दिला होता. परंतु अतिरिक्त ऑक्स‍िजन उपलब्ध व्हावा यासाठी महापौर नरेश म्हस्के हे सतत लिंडे कंपनीशी संपर्क साधत होते. आज पुन्हा लिंडे कंपनीने ठाणे शहरास  अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजन येत्या दोन दिवसात उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी आज झालेल्या बैठकीत नमूद केले.


महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संदीप माळवी यांच्या उपस्थितीत आज लिंडे कंपनीच्या व्यवस्थापनाशी बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी महापालिकेस अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजन पुरविण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता ठाणे महापालिकेस अतिरिक्त ऑक्स‍िजनचा साठा उपलब्ध होणार आहे.


          ठाणे शहरात ऑक्स‍िजनचा पुरवठा अपुरा पडत होता, तसेच काही रुग्णालये ही ऑक्स‍िजन नसल्यामुळे सुरू करता येणे शक्य नव्हते. या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के हे ऑक्स‍िजन उपलब्ध होणेकरिता लिंडे कंपनीसोबत सतत पाठपुरावा करीत होते. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत त्यांनी ठाणे महापालिकेस  15 टन ऑक्स‍िजनचा  अतिरिक्त पुरवठा देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ठाण्यातील कोविड बाधित रुग्णांना आता लवकर उपचार मिळण्यास मदत होणार आहे.


          ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील रुग्णालय येत्या चार दिवस कार्यान्वित होणार असून निश्चितच कोरोनाबाधित रुग्णांना उपचार घेणे सोईचे होणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद करत लिंडे कंपनीने केलेल्या महत्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. 

ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के ठाणे महापालिकेस लिंडे कंपनी कडून अतिरिक्त 15 टन ऑक्स‍िजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के Reviewed by News1 Marathi on April 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads